एकेकाही 90's चा काळ गाजवणारी महिमा चौधरी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. अशातच नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओमुळे तिचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. महिमा चौधरीने बॉलिवूडचे दिग्गज कॉमेडी स्टार संजय मिश्रा यांच्यासोबत लग्न करताना दिसत आहे. यावेळी ती पवळ्या साडीत खूपचं सुंदर दिसत होती. तिच्या हातात फुलांची माळ आणि लग्नविधी पार पाडण्यासाठी हवनकुंड देखील होत.
हेही वाचा- Rinku Rajguru : 'आशा' पुसणार 'आर्ची'ची इमेज? रिंकू राजगुरूच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज
मात्र महिमा चौधरी आधीच विवाहीत असून देखील त्यांनी संजय मिश्रा यांच्यासोबत हा विवाहसोहळा पार का पाडला? असा प्रश्न अनेकांना पडला. तर यामागच कारण असं की, हे लग्न खरं नसून तो त्यांच्या आगामी चित्रपटाचा प्रमोशन स्टंट होता. महिमा चौधरी आणि संजय मिश्रा यांचा 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' 19 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. यानिमित्त गुरुवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरच्या आधी, चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर चांगलाच गाजला होता. चाहते बऱ्याच काळापासून ट्रेलरची वाट पाहत होते. चित्रपटात विनोद आणि भावना दोन्ही आहेत. यावेळी महिमा चौधरी या सर्व नाट्यमय कृती करता एका फुलांनी सजवलेलया चादरीमधून आली. जिला 4 लोकांनी तिच्या डोक्यावर पकडून टेवलं होत. ती खऱ्याखुऱ्या नववधू प्रमाणे दिसत होती.
या चित्रपटाच्या ट्रेलरवरुन असं दिसत की, या चित्रपटाची कथा मुलाच्या विवाहाभोवती फिरणारी आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणे यात दुर्लभ प्रसाद नावाचा एक व्यक्ती आपल्या मुलाच लग्न निर्विघ्नपणे पार पडाव यासाठी प्रयत्न करत असतो. कारण ज्या मुलीसोबत दुर्लभ प्रसादच्या मुलाच लग्न ठरलेलं असत, त्या मुलीच्या घरातल्यांची अट असते की, मुलाच्या घरात एक तरी महिला असावी. यासाठी सर्वजण दुर्लभ प्रसादसाठी मुलगी शोधण्याच्या मागे लागतात.
त्यावेळी एक बिघडलेली मुलगी जी सिगारेट ओढते, दारू पिते अशा मुलीची एन्ट्री होते. ती मुलगी म्हणजे, महिमा चौधरी असते, त्यानंतर दुर्लभ प्रसाद आणि त्या महिलेमधील संबंध कसे वाढतात आणि त्यांच्यातील वादविवाद कसे मार्गी लागतात गे सर्व दाखवणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात संजय मिश्रा, व्योम यादव आणि महिमा चौधरी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान ट्रेलरनंतर या चित्रपटाला नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे.