‘विशेषतः शहरातल्या लोकांनी याची काळजी घ्यावी’; अभिनेते वैभव मांगलेंनी दिला ‘हा’ धोक्याचा इशारा, हे कोणतं नवं संकट?

सिनेकलाकार, सिनेसृष्टीतील मंडळी आपल्या मनोरंजनासह समाजातील विविध विषयांवर वेळोवेळी आपले मत मांडताना दिसतात.
actor vaibhav mangale
actor vaibhav mangale

मुंबई : ‘पाणी संकट..पाणी वाचवा… विशेषतः शहरातल्या लोकांनी याची काळजी घेतली पाहिजे’, हे आवाहन केले आहे मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले कलाकार वैभव मांगले यांनी. सिनेकलाकार, सिनेसृष्टीतील मंडळी आपल्या मनोरंजनासह समाजातील विविध विषयांवर वेळोवेळी आपले मतही मांडताना दिसतात. समाजात सुरू असलेल्या चांगल्या वाईट घटनांवर आपली मतं मांडणारे हे कलाकार अनेकदा आपले प्रबोधनही करातत. अशाच सुजाण आणि सजग कलाकारांपैकी एक म्हणजे वैभव मांगले हे आहेत. अभिनेते वैभव मांगले यांनी सध्या एका महत्त्वाच्या समस्येकडे नागरिकांचे लक्ष वळवले आहे. यंदाच्या वर्षी तुलनेने कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे राज्यातील काही भागात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तर शहरांमध्ये आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्येही पुढील काही काळात पाणी टंचाईची समस्या प्रखक्षाने जाणवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. वैभव मांगले यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करून या समस्येबाबत काळजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीची तयारी सुरू आहे? शोरूममध्ये बुकिंग करण्याआधी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version