Viral Memes on LPG Cylinder : सिलेंडरची साडी ते अंत्ययात्रा, पती-पत्नीमधील कॉमेडी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स

इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमिवर भारतात सर्वत्र LPG चा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर नेटिझन्सकडून मीम्सचा पाऊस पाडताना पाहायला मिळत आहे. 

Viral Memes on LPG Cylinder : सिलेंडरची साडी ते अंत्ययात्रा, पती-पत्नीमधील कॉमेडी; सोशल मीडियावर भन्नाट मीम्स

अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाला जवळपास 14 ते 15 दिवस उलटून गेले आहेत. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनत आहे. या संघर्षाचे पडसाद आता इतर देशांवरही उमटताना दिसत आहेत. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे भारतातील तेल आणि गॅस तुटवडा आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी LPG गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे.

हेही वाचा- India On Pakistan-Afghanistan War: ‘कोणताही धर्म रुग्णालय, रुग्णांवर हल्ला करण्याची परवानगी देत नाही’; त्या हल्ल्यावरून भारताने पाकिस्तानला सुनावले खडे बोल

इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमिवर भारतासह इतर देशातील गॅस एजन्सींनी व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबवला आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत केलेल्या नाकेबंदीमुळे मध्यपूर्वेतून येणाऱ्या गॅस टँकर्सची सागरी वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. यासर्व प्रकारामुळे आता भारतातील सर्वसामान्य जनतेला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर सामान्य जनता त्यांच्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहे. दरम्यान LPG च्या तुटवड्यावर भारतात मात्र विनोदाचा आणि हास्याचा कहर कमी झालेला नाही. भारतात सर्वत्र LPG चा तुटवडा जाणवत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर नेटिझन्सकडून मीम्सचा पाऊस पाडताना पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा- Iran Israel US War:तेहरानमध्ये इस्रायलचा भीषण हवाई हल्ला, खामेनेईनंतर इराणचा दुसरा मोठा नेता ठार?
LPG च्या तुटवड्याची बातमी पसरताच एक्स, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक लोक मजेशीर मीम्स तयार करून मनोरंजन करत आहेत. ‘मीम आर्मी’ने सामान्य माणसाची ही अवस्था मीम्सच्या माध्यमातून मांडली आहे. परिस्थिती कोणतीही असो, मीम्स बनवणे थांबत नाही. यावेळी लोकांनी एलपीजी आणि इलेक्ट्रिक इंडक्शनवर, चुलीकडे वळलेले शहरी नागरीक, गॅस पुरवठा करणाऱ्या केंद्रांवर या परिस्थितीबद्दलचे अनेक मजेशीर मीम्सही सोशल मीडियावर तयार केले आहेत. चला तर मग पाहूया LPG च्या तुटवड्यावर व्हायरल झालेल्या काही मीम्स प्रतिक्रिया.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number