Ganesh Utsav Song: अंगात ताप भरलेला, तरी मोहम्मद रफी यांनी गायले गणपतीचे ‘ते’ गाणे; आजही गणेशोत्सवात कायम आहे क्रेझ

या भक्तिगीतामध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत आशा भोसले, भूपिंदर सिंह, शैलेंद्र सिंह आणि अपन चक्रवर्ती या दिग्गजांचे सूर मिसळले होते.

Ganesh Utsav Song: अंगात ताप भरलेला, तरी मोहम्मद रफी यांनी गायले गणपतीचे ‘ते’ गाणे; आजही गणेशोत्सवात कायम आहे क्रेझ

Evergreen Ganesh Utsav Song 'Deva Ho Deva Ganpati Deva': भारतीय सिनेसृष्टीतील महान गायक मोहम्मद रफी यांच्या असीम गायनाची आणि समर्पणाची एक अद्भूत कथा 'देवा हो देवा गणपती देवा' या गाण्याशी जोडली गेली आहे. रेकॉर्डिंगच्या दिवशी खूप ताप असतानाही मोहम्मद रफी यांनी आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा सिद्ध करत हे गाणे पूर्ण केले. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम से बढ़कर कौन' या चित्रपटातील हे गाणे आज तब्बल 45 वर्षांनंतरही प्रत्येक गणेशोत्सवाची शान बनून राहिले आहे.

गाण्याच्या निर्मितीतील दिग्गज आणि कलाकारांचा सहभाग
रफी साहेबांच्या समर्पित गायकीसोबतच या गाण्याला इतर अनेक मोठ्या कलाकारांच्या साथीमुळे एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या गाण्याशी संबंधित महत्त्वाचे पैलू म्हणजे, या भक्तिगीतामध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत आशा भोसले, भूपिंदर सिंह, शैलेंद्र सिंह आणि अपन चक्रवर्ती या दिग्गजांचे सूर मिसळले होते. पडद्यावर हे गाणे मिथुन चक्रवर्ती, डॅनी डेन्जोंग्पा, अमजद खान आणि रंजीत यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांवर चित्रित केले गेले. दीपक बाहरी यांचे दिग्दर्शन आणि कलाकारांचा जबरदस्त उत्साह यामुळे हे गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले.'हम से बढ़कर कौन' हा 1981 मधील एक गाजलेला ॲक्शन-ॲडव्हेंचरपट होता, ज्यामध्ये विजयेंद्र घाटगे, रंजीता आणि काजल किरण यांच्याही मुख्य भूमिका होत्या.

कमिटमेंट आणि कामाप्रती असलेली असीम निष्ठा
मोहम्मद रफी आपल्या गायकीला केवळ एक व्यवसाय न मानता ती एक पवित्र जबाबदारी मानत असत. रेकॉर्डिंगच्या वेळी प्रकृती अत्यंत अस्वास्थ असतानाही त्यांनी गाणे पुढे ढकलण्याऐवजी किंवा थांबवण्याऐवजी पूर्ण ताकदीने गाणे रेकॉर्ड केले. त्यांच्या याच समर्पणामुळे गाण्यातील प्रत्येक शब्द आणि भाव ऐकणाऱ्यांच्या थेट काळजाला भिडतो.

हेही वाचा – Lalbaugcha Raja 2026 : बहुप्रतीक्षित लालबागचा राजा 2026 चा प्रथम दर्शन सोहळा संपन्न; बाप्पाचं भव्य रूप पाहण्यासाठी गणेशभक्तांची अलोट गर्दी

गल्लोगल्लीतील मंडपांपासून ते विसर्जनाच्या मिरवणुकीपर्यंत अधिराज्य
उत्साह, भक्तिभाव आणि दमदार संगीताचा मेळ असलेले हे गाणे प्रदर्शित होताच कल्ट क्लासिक ठरले. आज 45 वर्षांनंतरही देशाच्या कानाकोपऱ्यातील गणपती मंडपांमध्ये आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये हे गाणे वाजवले जाते. या गाण्याचा ताल कानावर पडताच गणेशभक्त पूर्ण उत्साहाने थिरकताना दिसतात, ज्यावरून या गाण्याची अथांग लोकप्रिय दिसून येते.

अजरामर ठरलेला संगीतमय वारसा
रफी साहेबांनी तापाच्या भरात गायलेले हे गाणे आज केवळ एक सिनेसंगीत राहिलेले नसून भारतीय सण-संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनले आहे. काळाच्या ओघात अनेक नवीन गाणी आली आणि गेली, मात्र 'देवा हो देवा गणपती देवा' या गाण्याची जादू आणि लोकप्रियता आजही तशीच कायम आहे.

हेही वाचा – Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी खासगी बसने कोकणात जातायं?; बुकींग करण्यापूर्वी पाहा हे वाढीव दर, मगच करा बुकींग

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number