Saturday, October 12, 2024 09:24:53 PM

National Family Day
नॅशनल फॅमिली डे - अमृताच्या फॅमिली ट्रीपची धम्माल मस्ती !

आयुष्यात काही ही झालं तरी आपल्याला आपल्या घरचे हे लागतात ! असं म्हणतात ना आयुष्यात सर्वात महत्वाचं स्थान जे कोणाला जाईल ते कुटुंबातील सदस्यांना कारण...

नॅशनल फॅमिली डे - अमृताच्या फॅमिली ट्रीपची धम्माल मस्ती  
Amruta Khanvilkar

 

आयुष्यात काही ही झालं तरी आपल्याला आपल्या घरचे हे लागतात ! असं म्हणतात ना आयुष्यात सर्वात महत्वाचं स्थान जे कोणाला जाईल ते कुटुंबातील सदस्यांना कारण आपलं कुटुंब हे  सपोर्ट सिस्टीम असते घडलेल्या सर्व गोष्टीचा सुख दुःखाचा आढावा रात्रीच्या जेवणाच्या वेळी एकत्र येऊन देणं झालेलं सगळं बाजूला ठेऊन घरातल्यांसोबत मनसोक्त गप्पा मारून मन हलका करणं ह्या सारखं दुसरं सुख असेल का काही ? असच काहीस अमृताच सुद्धा आहे. पण रोजच्या कामातून दगदगीतून आणि  शूटच्या धावपळीमधून अमृताला कुटुंबियांना वेळ द्यायला मिळत नाही आणि म्हणून यंदाचा " फॅमिली डे " तिच्यासाठी खास आहे. 

अमृता तिच्या कुटुंबियांसोबत  लंडन ट्रीप एन्जॉय करताना दिसतेय. आई बाबा आणि अमृता यांची लंडन ट्रीप ही मज्जा मस्ती ची असणार आहे यात शंका नाही. अमृता तिच्या समाज माध्यमांवर अनेक ट्रीप फोटोज् शेयर करत आहे आणि त्यातून तिची लंडन ट्रीप ची झलक बघायला मिळते. 

अमृताने तिच्या लंडन ट्रीप बद्दल नुकतीच एक पोस्ट समाज माध्यमावर वर शेयर केली यात ती म्हणते " पालकांसोबत एका वयानंतर प्रवास करताना जाणवतं की आपण लहान मुलांसोबत प्रवास करतोय. त्यांचा सोबत फिरण्याची एक वेगळी मज्जा असते मग ट्रीप मध्ये होणारे किस्से आणि प्रत्येक गोष्टीचा फोटो काढण्याच त्यांचं कुतूहल बघून गंमत वाटते " 

अमृता सध्या जोरदार काम करताना दिसत असली तरी ती तिच्या घरच्यांना देखील तितकाच वेळ देते आणि फॅमिली टाईम स्पेंड करतेय.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo