Badshah Death Threat: ‘पुढच्या वेळी थेट कपाळावर गोळी घालू…’; रॅपर बादशाहला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी

बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. टटेरी या गाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बिश्नोई टोळीने एक पत्रक जारी केले आहे.

Badshah Death Threat: ‘पुढच्या वेळी थेट कपाळावर गोळी घालू…’; रॅपर बादशाहला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी

Badshah Death Threat: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह याच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, आता त्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. टटीरी या गाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बिश्नोई टोळीने एक पत्रक जारी केले आहे. यामध्ये बादशाहने हरियाणाच्या संस्कृतीचा अपमान केल्याचा ठपका ठेवत, "पुढच्या वेळी थेट कपाळावर गोळी घालू," असा खळबळजनक इशारा दिला आहे. या धमकीमुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली असून बादशाहच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पानिपत गोळीबाराची जबाबदारी आणि बादशाहला इशारा
मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य रणदीप मलिक आणि अनिल पंडित (USA) यांनी पानिपत येथील एका 'हवाला' व्यावसायिकाच्या कार्यालयावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. याच संदर्भात जारी केलेल्या चिठ्ठीत त्यांनी बादशाहचा उल्लेख केला आहे. टोळीने म्हटले आहे की, "2024 मध्ये आम्ही तुला तुझ्या क्लबमध्ये केवळ 'ट्रेलर' दाखवला होता, पण आता तू मर्यादेबाहेर गेला आहेस." हरियाणाच्या संस्कृतीला कलंक लावल्याचा आरोप करत या टोळीने बादशाहला त्याचे गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा – Badshah Controversy: बादशाहच्या ‘टटीरी’ गाण्याने वाद पेटला; महिला आयोग संतापला, थेट अटकेची मागणी

महिला आयोगाची आक्रमक भूमिका आणि अटकेची मागणी
दुसरीकडे, हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनीही बादशाहविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. बादशाहच्या गाण्यांमधून महिलांचा किंवा संस्कृतीचा अवमान होत असल्याच्या तक्रारीनंतर आयोगाने त्याच्या अटकेची मागणी केली आहे. रेणू भाटिया यांनी केवळ अटकेवरच न थांबता, बादशाहचे पासपोर्ट जप्त करावा आणि त्याच्या सर्व कार्यक्रमांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. हरियाणा पोलिसांनी आधीच रॅपर बादशाहच्या अटकेचे आदेश दिल्याने त्याच्यापुढील कायदेशीर पेच अधिकच वाढला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number