Anushka Shetty Wedding: प्रभास नाही, तर ‘हा’ व्यक्ती होणार देवसेनाचा जोडीदार; 44 व्या वर्षी अनुष्का शेट्टी अडकणार विवाहबंधनात?

44 वर्षीय अनुष्का लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, तिने निवडलेला जोडीदार पाहून चाहते थक्क झाले आहेत.<br/>

Anushka Shetty Wedding: प्रभास नाही, तर ‘हा’ व्यक्ती होणार देवसेनाचा जोडीदार; 44 व्या वर्षी अनुष्का शेट्टी अडकणार विवाहबंधनात?

Anushka Shetty Wedding:  दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदानाच्या लग्नाच्या चर्चा ताज्या असतानाच, आता 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टीच्या विवाहाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 44 वर्षीय अनुष्का लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, तिने निवडलेला जोडीदार पाहून चाहते थक्क झाले आहेत.

प्रभाससोबतच्या चर्चांना पूर्णविराम?
'बाहुबली' चित्रपटातील देवसेना आणि अमरेंद्र बाहुबली यांची केमिस्ट्री पाहून ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र यावी, अशी लाखो चाहत्यांची इच्छा होती. अनुष्का आणि प्रभासच्या डेटिंगच्या अफवा अनेक वर्षे रंगल्या, मात्र दरवेळी त्यांनी आपण 'फक्त चांगले मित्र' असल्याचे सांगत या चर्चा फेटाळून लावल्या. आता अनुष्काच्या लग्नाच्या वृत्तामुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत.

कोण आहे अनुष्काचा होणारा पती?
मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्काचे हे लग्न 'लव्ह मॅरेज' नसून 'अरेंज मॅरेज' असणार आहे. अनुष्काचा होणारा पती सिनेसृष्टीतील नसून तो बंगळुरूमधील एक नामांकित उद्योजक (Businessman) आहे. तो शेट्टी कुटुंबाचा फॅमिली फ्रेंड असल्याचेही समजते. अनुष्काच्या पालकांनीच तिचे हे स्थळ निश्चित केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

लग्नाची तारीख आणि अधिकृत घोषणा
अनुष्काचे लग्न या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणावर अद्याप अनुष्का शेट्टी किंवा तिच्या कुटुंबाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. नेहमीप्रमाणे अनुष्काने आपल्या खासगी आयुष्याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.

हेही वाचा – Dhurandhar 2 : अनिल कपूरला 'धुरंधर 2' मधील 'या' भूमिकेसाठी विचारलं होतं.. पण दिला नकार.. स्वतःच सांगितलं 'हे' कारण

कारकिर्दीचा प्रवास
अनुष्का शेट्टीने आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. अलीकडेच 2025 मध्ये ती 'घाटी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यापूर्वी 'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी' मधील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. 'बाहुबली'मधील देवसेनेच्या भूमिकेने तिला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number