Ladki Bahin Marathi Movie: आता रुपेरी पडद्यावर गाजणार ‘लाडकी बहीण’; गौतमी पाटीलसह ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका; कधी रिलीज होणार चित्रपट ?

सर्वसामान्य महिलांच्या जीवनावर आधारित 'लाडकी बहीण' हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याचे अधिकृत पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे.<br/>

Ladki Bahin Marathi Movie: आता रुपेरी पडद्यावर गाजणार ‘लाडकी बहीण’; गौतमी पाटीलसह ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका; कधी रिलीज होणार चित्रपट ?

Ladki Bahin Marathi Movie: महाराष्ट्र सरकारची 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर आता चंदेरी दुनियेतही खळबळ उडवण्यासाठी सज्ज झाली आहे. सर्वसामान्य महिलांच्या जीवनावर आधारित 'लाडकी बहीण' हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्याचे अधिकृत पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे.

काय आहे चित्रपटाची संकल्पना?
'1500 रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी' अशी टॅगलाईन असलेला हा चित्रपट सरकारी योजनेचा गृहिणींच्या आयुष्यावर होणारा सकारात्मक परिणाम अधोरेखित करतो. एखादी साधी सरकारी योजना गरीब कुटुंबाला कसा आधार देऊ शकते आणि महिला एकत्र येऊन स्वावलंबनाकडे कशी वाटचाल करतात, याचे चित्रण यात पाहायला मिळेल. सामाजिक विषयावर भाष्य करताना यात विनोदी आणि नाट्यमय प्रसंगांची उत्तम गुंफण करण्यात आली आहे.

गौतमी पाटील आणि तगडी स्टारकास्ट
या चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यात एक खास 'गवळण' सादर करताना दिसणार आहे. चित्रपटामध्ये मराठीतील दिग्गज कलाकारांची फौज आहे. या चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर  उषा नाडकर्णी, उषा नाईक, सुरेखा कुडची, रुक्मिणी सुतार (सरू आजी), शशांक शेंडे, माधव अभ्यंकर आणि अनिल नगरकर यांसारखे मातब्बर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील.

हेही वाचा – Tettiri Song Controversy: 'टटीरी' गाण्यावरून रॅपर बादशाह अडचणीत; हरियाणा पोलिसांची लूकआउट नोटीस, वाद वाढताच मागितली माफी

रिलीज डेट आणि उत्सुकता
सरकारी कार्यालयांपासून ते घराघरात चर्चेचा विषय ठरलेली ही योजना आता मोठ्या पडद्यावर कशी मांडली जाते, याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. 17 एप्रिल रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number