Operation Sindoor Movie: मोठी घोषणा! पहलगाममधील दहशतवादी हल्ला अन् भारताचं चोख प्रत्युत्तर, ‘ऑपरेशन सिंदूर’ लवकरच मोठ्या पडद्यावर

हा चित्रपट केवळ एक काल्पनिक कथा नसून, तो लेफ्टनंट जनरल के. जे. एस. 'टायनी' ढिल्लों यांच्या 'ऑपरेशन सिंदूर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक्स इनसाईड पाकिस्तान' या पुस्तकावर आधारित आहे.

Operation Sindoor Movie: मोठी घोषणा! पहलगाममधील दहशतवादी हल्ला अन् भारताचं चोख प्रत्युत्तर, ‘ऑपरेशन सिंदूर’ लवकरच मोठ्या पडद्यावर

नवी दिल्ली: भारतीय चित्रपटसृष्टीत सध्या राष्ट्रभक्ती आणि गुप्तहेर कथांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या 'धुरंधर 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या आठवड्याभरात 1000 कोटींचा आर्थिक फायदा मिळवत या चित्रपटाने कराचीच्या गुन्हेगारी विश्वातील एका भारतीय गुप्तहेराची रोमहर्षक कथा पडद्यावर जिवंत केली. या अभूतपूर्व यशाची धगधग कायम असतानाच, आता भारतीय संरक्षण दलाच्या आणखी एका अंगावर काटा आणणाऱ्या शौर्यगाथेची रुपेरी पडद्यावर एन्ट्री होणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' या नव्या चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली असून, भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आधारित ही सत्यकथा पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

'द काश्मीर फाईल्स'सारख्या संवेदनशील आणि गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता 'ऑपरेशन सिंदूर'चे शिवधनुष्य पेलणार आहेत. या बहुचर्चित प्रकल्पाविषयी चित्रपट वर्तुळात अनेक दिवसांपासून कुजबूज सुरू होती. अखेर 26 मार्च रोजी 'टी-सीरीज'ने या चित्रपटाची अधिकृत घोषणा करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दिलेले चोख आणि सडेतोड प्रत्युत्तर या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच मोठ्या पडद्यावर उलगडले जाणार आहे.

या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी निर्माता भूषण कुमार आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हातमिळवणी केली आहे. हा चित्रपट केवळ एक काल्पनिक कथा नसून, तो लेफ्टनंट जनरल के. जे. एस. 'टायनी' ढिल्लों यांच्या 'ऑपरेशन सिंदूर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक्स इनसाईड पाकिस्तान' या गाजलेल्या पुस्तकावर आधारित आहे.

हेही वाचा: Narhari Zirwal: रोहित पवारांचा सावध पवित्रा, तर अंबादास दानवेंची चौकशीची मागणी; झिरवाळ प्रकरणाने सत्ताधारी अडचणीत?

पहलगाम हल्ल्यानंतरच्या घटनाक्रमाचे सखोल संशोधन करून, वास्तव आणि सिनेमॅटिक स्वातंत्र्याचा सुरेख मेळ साधत भारतीय सशस्त्र दलांच्या कारवाईचे अचूक चित्रण यातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटाच्या घोषणेवेळी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या संकल्पनेवर प्रकाश टाकला. आव्हानात्मक आणि पडद्याआड राहिलेल्या कथा लोकांसमोर आणणे हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'ऑपरेशन सिंदूर'ची निर्मिती करताना लष्कराच्या विविध विभागांसोबत अत्यंत सूक्ष्म पातळीवर संशोधन करण्यात आले आहे. "नेमके काय, कसे आणि का घडले, हे समजून घेण्यासाठी आम्ही तळागाळात जाऊन माहिती गोळा केली आहे. ही घटना सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीपेक्षा कितीतरी पटीने अधिक गुंतागुंतीची आणि अचूक आहे," असा दावा अग्निहोत्री यांनी केला आहे. कथेतील हा प्रामाणिकपणा आणि थरार प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

या चित्रपटाच्या कथेचा मूळ आधार म्हणजे 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसरन व्हॅली येथे झालेला भ्याड दहशतवादी हल्ला. या अमानुष हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला होता. यामागे पाकिस्तानपुरस्कृत 'जैश-ए-मोहम्मद' आणि 'लष्कर-ए-तय्यबा' या दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. या भ्याड कृतीचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय सैन्याने 7 मे 2025 रोजी धडक कारवाई करत 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकची शौर्यगाथा आता रुपेरी पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. 

हेही वाचा: Sangli Crime : सांगली हादरली! निर्दयी बापाने पोटच्या लेकींचा केला अमानुष छळ, रात्रभर पत्र्याला उलटं टांगलं आणि….; एकीचा दुर्दैवी अंत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number