सरत्या वर्षात अनेक सिनेसृष्टीतील कलाकार विवाहबंधनात अडकले. या लग्नसराईच्या काळात एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. गुप्त कोर्ट मॅरेजपासून ते भव्य पारंपारिक समारंभांपर्यंत, आपल्या आवडत्या स्टार्सनी अखेर त्यांच्या वचनबद्धतेला अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. 2025 हे वर्ष सेलिब्रिटी वेडिंग्ससाठी संस्मरणीय ठरलं. प्रत्येक स्टारने आपला वेडिंग लुक आगळा-वेगळा, सुंदर आणि खास बनवला आणि फॅन्सच्या मनात कायमस्वरूपी छाप सोडली. या वर्षी लग्नसराईच्या काळात एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. आज आपण मराठी मनोरंजन विश्वातील अशा जोड्यांवर नजर टाकूया, ज्यांनी 2025 मध्ये आपल्या आयुष्यातील एक नवा प्रवास सुरू केला आहे.
हेही वाचा- Year Ender 2025 : 2025 मध्ये लग्नबंधनात अडकलेली लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपी
यूट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीने 25 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या लॉन्ग-टाइम बॉयफ्रेंड वृषांक खनालसोबत विवाह केला. इतर अनेक वधूंप्रमाणे लाल लहंगा निवडण्याऐवजी प्राजक्ताने गोल्डन लहंगा परिधान केला. तिचा हा हटके आणि ग्लोईंग लुक चाहत्यांना खूप भावला. 2025 मध्ये सर्वात गाजलेल्या जोडप्यात मराठी बिग बॉसच्या सिझन 5 चा विजेता सूरज चव्हाण, पूजा बिरारी आणि 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाड यांच नाव चाहत्यांकडून घेतलं जात आहे. यांच्या विवाहसोहळ्या दरम्यान अनेक वादग्रस्त गोष्टी देखील बाहेर आल्या. मराठी बिग बॉसच्या सिझन 5 चा विजेता सूरज चव्हाण याने नुकतचं 29 नोव्हेंबरला मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पाडला. यादरम्यान अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने त्याच्या लग्नात उपस्थित असलेल्या पाहुणेमंडळींवर गर्दी आणि होणाऱ्या गोंधळामुळा आवाज चढवला होता, ज्यामुळे सूरजच्या लग्नात ती चाहत्यांच्या नजरेत आली. तर दुसरीकडे 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या प्राजक्ता गायकवाड आणि उद्योगपती शंभुराज खुटवड यांच्या लग्नात त्यांनी वरातीत केलेल्या शिवनृत्य या देखाव्यामुळे आणि तिच्या नंदीवरील स्वारीमुळे तिच्यावर टीकांचा भडीमार पडू लागला. दरम्यान 2 डिसेंबरला विवाहबंधनात अडकलेली पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांच लग्न निर्विघ्नपणे पार पडलं असून पूजा बिरारी ही बांदेकरांच्या घराची सून बनली आहे.
तसेच बिग बॉस मराठी 5 फेम कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरने देखील 16 फेब्रुवारीला गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली.
तसेच स्टार प्रवाहवरील सुप्रसिद्ध मालिका 'लक्ष्मीच्या पावलांनी' यामधील अद्वैत चांदेकर म्हणजेच अभिनेता अक्षर कोठारीने 20 जूनला त्याची बालपणीची मैत्रीण सारिका खासनिस हिच्याशी गुपचूप लग्न उरकले.
तसेच 4 डिसेंबरला अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनं शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. तर 5 डिसेंबरला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता निमिष कुलकर्णीने कोमल भास्करशी लग्नगाठ बांधली.
त्याचसोबत 16 नोव्हेंबर रोजी अभिनेता मेघन जाधव याने अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरबरोबर लग्न केले. मेघन आणि अनुष्का हे दोघेही अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.