Hera Pheri 3: हेरा फेरी 3 अधिकच संकटात! निर्मात्यानंतर आता दिग्दर्शकानेही फिरवली पाठ; म्हणाले, ‘कोणताही संबंध…

'हेरा फेरी 3'वर पुन्हा संकट आले आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी चित्रपटातून बाहेर पडत हा सिनेमा कधीच प्रदर्शित होणार नाही, असा धक्कादायक दावा केला आहे.

Hera Pheri 3: हेरा फेरी 3 अधिकच संकटात! निर्मात्यानंतर आता दिग्दर्शकानेही फिरवली पाठ; म्हणाले, ‘कोणताही संबंध…

अभिनेता अक्षय कुमारच्या कारकिर्दीतील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असलेल्या 'हेरा फेरी' फ्रँचायझीबाबत पुन्हा एकदा धक्कादायक घडामोड समोर आली आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या 'हेरा फेरी 3' या चित्रपटावर पुन्हा संकटाचे ढग दाटले असून, आता चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनीच या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

'हेरा फेरी 3'ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ही मोठी निराशाजनक बातमी मानली जात आहे. याआधी अभिनेता परेश रावल यांनी चित्रपटातून बाहेर पडल्याच्या चर्चांमुळे हा चित्रपट वादात सापडला होता. त्यानंतर परिस्थिती काहीशी सुरळीत होत असल्याचे चित्र दिसत असतानाच आता दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या एक्झिटमुळे चित्रपटाचे भवितव्य पुन्हा प्रश्नचिन्हात आले आहे.

हेही वाचा: Daryabhavani: 'श्री शिवराज अष्टक'चा सातवा अध्याय येतोय! दिग्पाल लांजेकरांच्या 'दर्याभवानी'त उलगडणार शिवरायांच्या सागरी सामर्थ्याचा थरार

चित्रपटाचे निर्माता फिरोज नाडियादवाला यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन आता 'हेरा फेरी 3'चा भाग नसल्याचे स्पष्ट केले. या विधानानंतर प्रियदर्शन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला.

प्रियदर्शन म्हणाले, 'सध्या माझा 'हेरा फेरी 3'शी कोणताही संबंध राहिलेला नाही.' एवढेच नव्हे, तर त्यांनी चित्रपटाच्या भवितव्याबाबतही मोठे विधान केले आहे. त्यांच्या मते, सध्या सुरू असलेले कायदेशीर वाद आणि निर्मिती पातळीवरील मतभेद पाहता हा चित्रपट प्रत्यक्षात प्रदर्शित होईल की नाही, याबाबतही शंका आहे.

दिग्दर्शकांनी सांगितले की, चित्रपटाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर अजूनही एकमत झालेले नाही. त्यामुळे 'हेरा फेरी 3'चा मार्ग अधिक कठीण बनला आहे. काही माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी 'हा चित्रपट कदाचित कधीच प्रदर्शित होणार नाही,' असेही म्हटल्याने चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे.

हेही वाचा: Shraddha Kapoor Eetha Movie Controversy: श्रद्धा कपूरचा 'ईठा' वादात! कुटुंबियांनी केली मोठी मागणी, 'या' कृतीवर नोंदवला तीव्र आक्षेप

दरम्यान, 'हेरा फेरी' फ्रँचायझीच्या हक्कांबाबतही मोठा वाद सुरू आहे. सेव्हन आर्ट्स इंटरनॅशनल या निर्मिती संस्थेने 'हेरा फेरी' आणि त्यातील पात्रांचे हक्क आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. मात्र निर्माता फिरोज नाडियाडवाला यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. या वादामुळे चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.

सन 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हेरा फेरी'ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले होते. त्यानंतर 2006 मध्ये आलेल्या 'फिर हेरा फेरी'लाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. या दोन्ही चित्रपटांतील अक्षय कुमार, परेश रावल आणि Suniel Shetty यांची तिकडी आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number