Monday, March 09, 2026 09:07:20 AM

Priyanka Chopra : 'मी फक्त 11 वर्षांची होते आणि कॅबमध्ये..., तेव्हा माझ्या आईची दुसरी बाजू पाहिली'; 'दि ब्लफ'च्या प्रमोशनवेळी प्रियांका चोप्रानं सांगितला थरारक अनुभव

दि ब्लफ चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांका चोप्राने तिच्या आयुष्यातील एक थरारक प्रसंग सांगितला.

priyanka chopra  मी फक्त 11 वर्षांची होते आणि कॅबमध्ये तेव्हा माझ्या आईची दुसरी बाजू पाहिली दि ब्लफच्या प्रमोशनवेळी प्रियांका चोप्रानं सांगितला थरारक अनुभव

मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने आता हॉलीवूडमध्येही जम बसवला आहे. गेल्या दोन दशकांपासून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी नॅशनल अवॉर्ड विनर अभिनेत्री प्रियांका आता हॉलीवूड चित्रपटांमध्ये सर्रास दिसू लागली आहे. आताही प्रियांका चोप्रा तिच्या आगामी दि ब्लफ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. नुकतेच तिने दि ब्लफ चित्रपटाच्या निमित्ताने लॉस अँजलिसमधील कॅलिफोर्निया येथे झालेल्या मुलाखतीत तिच्या आयुष्यातील एक थरारक प्रसंग सांगितला.

हेही वाचा : The 50 Winner : 'लायन'च्या महालात मराठमोळा डंका! 'द 50' शोचा पहिला विजेता ठरला शिव ठाकरे?

प्रियांका चोप्राने सांगितले की, 'ती जेव्हा 11 वर्षांची होती तेव्हा दिल्लीत आपल्या आईसोबत एका कॅबमधून प्रवास करताना दिला एक भीतीदायक अनुभव आला. तिच्या आईने अचानक वाहनचालकाला खडसवले आणि मला सुरक्षित केले. तो वाहनचालक नेहमीपेक्षा वेगळ्या रस्त्याने गाडी वळवत होता. रात्रीचे 11 वाजून गेले होते. त्यावेळी आईने रुद्रावतार घेत त्या चालकाची खरडपट्टी काढली. माझ्या आईचे हे रुप मी पहिल्यांदा पाहिले. आपल्या मुलीला सुरक्षित ठेवण्यासाठी एक आई काय करू शकते, हे त्या दिवशी पाहायला मिळाले.'  


सम्बन्धित सामग्री