राजकुमार रावची मध्यवर्ती भूमिका, पण मराठमोठा अभिनेता भाव खाऊन गेला; ‘प्रहार’ ट्रेलर पाहून ललित प्रभाकरच्या अभिनयाचं होतयं कौतुक

'प्रहार' ट्रेलरमध्ये ललित प्रभाकर भाव खाऊन गेला! कसाबच्या भूमिकेने जिंकली मनं

राजकुमार रावची मध्यवर्ती भूमिका, पण मराठमोठा अभिनेता भाव खाऊन गेला; ‘प्रहार’ ट्रेलर पाहून ललित प्रभाकरच्या अभिनयाचं होतयं कौतुक

राजकुमार रावच्या ‘प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. यात राजकुमार राव प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट 26/11 च्या घटनेनंतर कसाबला मिळालेल्या शिक्षेचा आणि निकम यांच्या संघर्षाचा प्रवास दाखवतो. पण या ट्रेलरमध्ये हिरोपेक्षा जास्त चर्चा होतेय ती अजमल कसाबची भूमिका साकारणाऱ्या मराठी अभिनेत्याची म्हणजेच ललित प्रभाकरची.

टीझरमध्ये फक्त झलक दिसली होती, पण ट्रेलरमध्ये ललितचा पूर्ण लूक समोर आला आहे. हुबेहूब कसाबसारखा दिसणारा लूक, त्याची देहबोली, नजर आणि उर्दू मिश्रित हिंदी बोलण्याची शैली – सगळ्यावर ललितने प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसते. पाकिस्तानातील ट्रेनिंगचे सीन्स आणि कोर्टात स्वतःची बाजू मांडतानाचा सीन अंगावर काटा आणतो.

‘जुळून येती रेशीमगाठी’ मधून घराघरात पोहोचलेला ललितने मराठीत अनेक हिट सिनेमे हिरो म्हणून दिले. आता बॉलिवूडमध्ये पहिल्याच वेळी तो खलनायकाच्या भूमिकेत दिसतोय आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर ललितवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी कमेंट केले आहे की, “ललितने कसाब जिवंत केला आहे.” हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number