मुंबई : बॉलिवूडमध्ये कायमच चर्चेत असणारी राखी सावंतची नाटोंकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही काळ दुबईत घालवल्यानंतर ती नुकतीच मुंबईत परतली असून, लवकरच ती बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार असल्याचं समजतं. परंतु, या वेळेसही राखीने एंट्रीपूर्वी असा काही “ड्रामा” केला आहे की सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे!
राखीचा एक नवीन पापाराझी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी असा दावा करते की तिने सलमान खानसाठी आपल्या दोन्ही किडन्या विकल्या आहेत! हो, अगदी खरंच राखी असं बोलली आहे. राखी म्हणते, “मी सलमान भाईसाठी सोन्याची अंगठी घेतली आहे, आणि ती आणण्यासाठी मी माझ्या दोन्ही किडन्या विकल्या!”
या विधानानंतर नेटकरी अक्षरशः थक्क झाले आहेत. काहींनी हा राखीचा विनोद मानला आहे, तर काहींना वाटतं की हा बिग बॉसमधील तिच्या नव्या “एंट्री ड्रामाचा” भाग आहे. राखी पुढे म्हणते, “सलमान भाईसाठी मी काहीही करू शकते… किडनीच काय, माझं सर्वस्व देऊ शकते.” तिच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे वळले आहे.
हेही वाचा: Cancer-fighting Nutrients: 'या' चार भाज्यांचा आहारात समावेश करा, कॅन्सर कधीच जवळ येणार नाही
राखी सावंत आणि सलमान खान यांचं नातं नेहमीच चर्चेत राहिलं आहे. राखी सलमानला आपला “भाऊ” म्हणते आणि त्याचं नाव घेताच तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसते. सलमाननेही राखीच्या कठीण प्रसंगात तिची साथ दिली होती, त्यामुळे राखी त्याच्याबद्दल नेहमीच आदर व्यक्त करते.
दुबईत काही आठवडे घालवून राखीने आता स्वतःला “श्रीमंत” घोषित केलं आहे. “मी इतकी श्रीमंत आहे की फक्त केसांचा कलर करायला दुबईला जाते,” असं ती म्हणाली. याच वेळी तिने बिग बॉसमधील तान्या मित्तल हिला टोमणे मारले. राखीच्या बोलण्यातून स्पष्ट होतंय की बिग बॉसच्या घरात तिचं लक्ष्य नेमकं कोणावर असणार आहे!
आता प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न आहे. राखी बिग बॉसच्या घरात कधी पाऊल ठेवणार आणि तिच्या या “किडनी ड्राम्याचं” पुढचं प्रकरण काय असणार? ती घरात तान्या मित्तलची “शाळा” घेणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. एक मात्र नक्की राखी सावंत पुन्हा एकदा बॉलिवूड आणि टेलिव्हिजनच्या चर्चेचा केंद्रबिंदू बनली आहे आणि तिचा पुढचा “ड्रामा” काय असणार, हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांची नजर आता बिग बॉसच्या दारावर खिळली आहे.
हेही वाचा: Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारचा निर्णय; उच्चस्तरीय समिती सादर करणार कर्जमाफीचा आराखडा