Tatiri Song Controversy: रॅपर बादशाहकडून ‘टटीरी’ गाण्याबद्दल लेखी माफी; 50 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

गाण्यातील अश्लील शब्द आणि चित्रिकरणाबाबत हरयाणा राज्य महिला आयोगाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर, बादशाहने मंगळवारी आयोगाकडे लेखी माफीनामा सादर केला.

Tatiri Song Controversy: रॅपर बादशाहकडून ‘टटीरी’ गाण्याबद्दल लेखी माफी; 50 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

Tatiri Song Controversy: प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या ‘टटीरी’ या गाण्यावरून निर्माण झालेला वाद आता निवळण्याची चिन्हे आहेत. गाण्यातील अश्लील शब्द आणि चित्रिकरणाबाबत हरयाणा राज्य महिला आयोगाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर, बादशाहने मंगळवारी आयोगाकडे लेखी माफीनामा सादर केला. विशेष म्हणजे, पश्चात्ताप म्हणून बादशाहने 50 गरजू मुलींच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा आणि त्यांच्यासाठी निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

महिला आयोगासमोर हजेरी आणि प्रायश्चित्त
‘टटीरी’ गाण्यातील काही शब्दांमुळे महिलांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप झाला होता, ज्यानंतर बादशाहला महिला आयोगाने समन्स बजावले होते. बादशाहचे वकील अक्षय दहिया यांनी माहिती दिली की, रॅपरने आयोगासमोर हजर राहून आपली बाजू मांडली आणि लेखी माफी मागितली. 50 मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून समाजात सकारात्मक संदेश देण्याचा बादशाहचा प्रयत्न असल्याचे वकिलांनी नमूद केले. या प्रकरणी हरयाणा पोलिसांनी यापूर्वीच एफआयआर (FIR) दाखल केला असून गाण्याशी संबंधित सर्व लिंक्स आणि सोशल मीडियावरील ‘रील्स’ (Reels) हटवण्याचे आदेश दिले आहेत.

“मी हरयाणाचा सुपुत्र”; रॅपरचा भावनिक व्हिडिओ
वाद उफाळल्यानंतर बादशाहने सोशल मीडियावर एक व्हिडिओ संदेश जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली होती. “मी स्वतः हरयाणाचा सुपुत्र असून माझी नाळ या मातीशी जोडलेली आहे. कोणत्याही महिला किंवा मुलाचा अपमान करण्याचा माझा कधीही हेतू नव्हता. गाण्यातील त्या विशिष्ट शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला,” असे त्याने म्हटले होते. हरयाणातील जनतेने आणि चाहत्यांनी मोठ्या मनाने आपल्याला क्षमा करावी, असे आवाहनही त्याने या व्हिडिओद्वारे केले होते.

हेही वाचा – Salman Khan On Rajpal Yadav: ’30 वर्षांचे काम आणि कलेची किंमत…’; राजपाल यादवसाठी सलमान खानने ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर

काय होता नेमका वाद?
बादशाहचे ‘टटीरी’ हे गाणे 1 मार्च 2026 रोजी प्रदर्शित झाले होते. मात्र, गाण्यातील काही शब्द आणि दृश्यांवर (Visuals) अश्लीलतेचा शिक्का मारत अनेक सामाजिक संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. गाण्याच्या लोकप्रियतेमुळे अनेक प्लॅटफॉर्मवर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते, परंतु कायदेशीर कारवाई सुरू होताच बादशाहने हे गाणे अधिकृत चॅनेलवरून काढून टाकले. सध्या बादशाह आपल्या इतर म्युझिक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असला, तरी या कायदेशीर प्रकरणाने त्याच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number