Rashmika Mandanna: दक्षिणेपासून बॉलिवूडपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना आता खऱ्या अर्थाने 'पॅन-इंडिया स्टार' ठरली आहे. कोविड काळानंतर अनेक कलाकारांना अडचणींना सामोरे जावे लागले, मात्र रश्मिकाने आपल्या मेहनती आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर तब्बल 3,184.81 कोटी रुपयांची बॉक्स ऑफिस कमाई करून विक्रम प्रस्थापित केला आहे.
कोरोनानंतर अनेक चित्रपट अडचणीत आले असताना रश्मिकाचे चित्रपट मात्र सलग हिट ठरले. कोइमोईच्या अहवालानुसार, रश्मिकाने केवळ 10 चित्रपटांमधून हा प्रचंड आकडा गाठला आहे. तिच्या प्रमुख चित्रपटांचा बॉक्स ऑफिस आकडा असा आहे:
पुष्पा: द राइज – 268 कोटी
आदवल्लू मिकू जोहरलू – 9.57 कोटी
सीता रामम – 65.49 कोटी
गुडबाय – 6.75 कोटी
वारिसु – 178.80 कोटी
अॅनिमल – 554 कोटी
पुष्पा 2 – 1,265.97 कोटी
छावा – 615.39 कोटी
सिकंदर – 129.95 कोटी
कुबेरा – 90.89 कोटी
या सर्व चित्रपटांमधून एकत्रित कमाई 3,184.81 कोटी इतकी झाली आहे, जी आजवर क्वचितच एखाद्या अभिनेत्रीने साध्य केली आहे.
अभिनय आणि विविधतेचा अनोखा प्रवास
रश्मिका मंदानाने आपल्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ती फक्त ग्लॅमरस पात्रांपुरती मर्यादित न राहता भावनिक, गंभीर आणि प्रयोगशील भूमिकांमध्येही उत्तम कामगिरी करत आली आहे. तिच्या अभिनयातील नैसर्गिकता आणि सहजता यामुळे ती चाहत्यांची लाडकी बनली.
हेही वाचा - Chiranjeev Perfect Bighadlay: चिरंजीव परफेक्ट बिघडलाय! नव्या पिढीसाठी एक उत्तम कलाकृती
‘थामा’मुळे पुन्हा चर्चेत
सध्या रश्मिका मंदाना तिच्या आगामी ‘थामा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती आयुष्मान खुरानासोबत मुख्य भूमिकेत दिसणार असून, ती एका व्हॅम्पायरच्या प्रेयसीची भूमिका साकारत आहे. ही भूमिका तिच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक मानली जात आहे. चित्रपट 21 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, रश्मिका लवकरच ‘मीसा’ आणि अॅटली कुमार यांच्या ‘AA 22’ या प्रोजेक्ट्समध्येही झळकणार आहे.
हेही वाचा - Parineeti Chopra Blessed with Baby Boy: परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा झाले आई-बाबा! अभिनेत्रीने दिला गोंडस मुलाला जन्म
कोविडनंतर अनेक कलाकारांचा ग्राफ खाली गेला असताना रश्मिका मंदानाने आपल्या कामगिरीने नवा मापदंड निर्माण केला आहे. फक्त काही वर्षांतच ती भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक ठरली असून, तिचा हा प्रवास प्रत्येक उदयोन्मुख कलाकारासाठी प्रेरणादायी ठरतो आहे.