Rhea Chakraborty Passport: अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी तिच्या चर्चेत येण्याचं कारण वेगळं आहे. तब्बल पाच वर्षांनंतर तिला तिचा पासपोर्ट परत मिळाला असून, मुंबई उच्च न्यायालयाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले आहेत.
रियाची आनंद व्यक्त करणारी पोस्ट
पासपोर्ट परत मिळाल्यानंतर रियाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. तिने पासपोर्टचा फोटो शेअर करत लिहिले, 'गेल्या पाच वर्षांपासून माझा संयमच माझा खरा पासपोर्ट होता. असंख्य लढाया आणि अंतहीन आशेनंतर, आज माझा पासपोर्ट माझ्या हातात परत आला आहे. आता मी आयुष्याच्या दुसऱ्या अध्यायासाठी सज्ज आहे.' तिने पोस्टचा शेवट 'सत्यमेव जयते' या शब्दांनी केला. काही तासांतच या पोस्टला हजारो लाइक्स आणि शुभेच्छा मिळाल्या. तिचे मित्र आणि चाहते 'वेलकम बॅक टू फ्रीडम', 'तुझ्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा अशा कमेंट्स करत आहेत.
हेही वाचा - Rashmika-Vijay Engagement: रश्मिका-विजयचं नातं पुढच्या टप्प्यावर; गुपचूप उरकला साखरपुडा ; 'या' महिन्यात होणार लग्न
पासपोर्ट का जप्त करण्यात आला होता?
दरम्यान, 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणानंतर, ड्रग्जशी संबंधित चौकशीदरम्यान रियाचा पासपोर्ट तपासासाठी जप्त करण्यात आला होता. त्या प्रकरणात NCB आणि CBI दोन्ही संस्थांनी चौकशी केली होती. या वर्षी मार्च 2025 मध्ये, सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आणि रिया चक्रवर्ती तसेच तिच्या कुटुंबावरील सर्व आरोप निराधार असल्याचे नमूद केले. त्यानंतर न्यायालयाने तिचा पासपोर्ट परत करण्याचा आदेश दिला.
हेही वाचा - Kantara 2 Box Office Collection : पहिल्याच दिवशी 'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू! जाणून घ्या एकूण कमाई
नव्या सुरुवातीसाठी सज्ज रिया
गेल्या काही वर्षांत रिया चक्रवर्ती चित्रपट आणि जाहिरातींपासून दूर होती. आता पासपोर्ट परत मिळाल्यानंतर ती पुन्हा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स आणि प्रवासासाठी तयार असल्याचे संकेत तिच्या पोस्टमधून दिसून येत आहेत.