मुंबई : सध्या ‘कांतारा चॅप्टर 1’ चित्रपटाची धूम सुरू आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी खेचून घेणाऱ्या सुपरहिट चित्रपटाचा लेखन, दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टी असून त्यानं नुकतीच केबीसीमध्ये हजेरी लावली. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम कौन बनेगा करोडपतीमध्ये ऋषभ शेट्टी यांनी उपस्थिती दर्शवत बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत धमाल मस्ती केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ऋषभ शेट्टीनं कार्यक्रमात थलायवा सुपरस्टार रजनीकांत यांची चालण्याची स्टाईल सादर केली असून अमिताभ बच्चन यांनी त्यांचा लोकप्रिय संवाद उपस्थितांना ऐकवला.
केबीसीचा हा एपिसोड 17 ऑक्टोबर रोजी सोनी वाहिनीवर सादर झाला. या एपिसोडमध्ये ऋषभ शेट्टी यांनी आपल्या आयुष्यातील अनेक रंजन किस्से सांगितले. तिथे उपस्थित एका प्रेक्षकानं त्यांना रजनीकांत यांची वॉक करण्यासाठीची विनंती केली असता, ऋषभ यांनी ती वॉक आणि स्टाईल सादर केली. आपण रजनीकांत, राजकुमार, अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते असल्याचे यावेळी ऋषभ शेट्टीनं सांगितले. त्यांनी अमिताभ बच्चन यांना अग्निपथ चित्रपटातील फेमस डायलॉग म्हणण्याचीदेखील विनंती केली. तर बिग बी यांनीही पोलीस स्टेशनमधील ‘विजय दिनानाथ चौहान…’, हा डायलॉग त्याच पद्धतीने खुर्चीवर बसत सादर केला. या दोघांच्याही सादरीकरणानंतर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.
Dekhiye Kaun Banega Crorepati, aaj raat 9 baje sirf #SonyEntertainmentTelevision and Sony LIV par.@SrBachchan #KBC #KaunBanegaCrorepati #AmitabhBachchan #KBC2025 #JahanAkalHaiWahanAkadHai #KBC17 #StayTuned pic.twitter.com/7G0CxTctrZ — sonytv (@SonyTV) October 17, 2025