Sanjay Dutt : संजय दत्तचा जबरा फॅन! चाहत्याकडून ‘गोल्ड-प्लेटेड’ iPhone 17 भेट; सुनील दत्त – नर्सिग यांच्याशी जुळलं कनेक्शन

नुकतीच दुबईमध्ये संजय दत्तची भेट एका पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर आणि चाहत्याशी झाली, ज्याने त्याला चक्क सोन्याचा मुलामा असलेला (Gold-plated) iPhone 17 भेट दिला आहे.

Sanjay Dutt : संजय दत्तचा जबरा फॅन! चाहत्याकडून ‘गोल्ड-प्लेटेड’ iPhone 17 भेट; सुनील दत्त – नर्सिग यांच्याशी जुळलं कनेक्शन

Sanjay Dutt: बॉलिवूडचा सुपरस्टार संजय दत्त ऊर्फ ‘संजू बाबा’ याचे जगभरातील फॅन फॉलोईंग पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नुकतीच दुबईमध्ये संजय दत्तची भेट एका पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर आणि चाहत्याशी झाली, ज्याने त्याला चक्क सोन्याचा मुलामा असलेला (Gold-plated) iPhone 17 भेट दिला आहे. काशिफ जमीर असे या चाहत्याचे नाव असून, त्याने दिलेल्या या महागड्या आणि वैयक्तिक भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या भेटीत केवळ विलासताच नाही, तर संजय दत्तसाठी अत्यंत महत्त्वाचे असे भावनिक मूल्यही दडलेले आहे.

iPhone च्या बॅक पॅनेलवर दत्त कुटुंबाचा भावनिक ठेवा
या सोन्याच्या आयफोनची खरी वैशिष्ट्ये त्याच्या मागील बाजूला (Back Panel) पाहायला मिळतात. काशिफने या फोनवर संजय दत्तचा त्याच्या आई-वडिलांसोबतचा नर्गिस दत्त आणि सुनील दत्त एक अत्यंत दुर्मिळ फोटो कोरला आहे. या फोटोच्या वरच्या बाजूला “Sanju Baba” आणि खाली “Love” असे शब्द कोरलेले आहेत. आपल्या पालकांचे चित्र फोनवर पाहून संजय दत्त प्रचंड भारावून गेल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. आयफोनव्यतिरिक्त, काशिफने संजू बाबाला एक प्राचीन (Antique) घड्याळ आणि सोन्याचे दागिनेही भेट म्हणून दिले आहेत.

हेही वाचा – Sankarshan Karhade: रात्री पोलिसांनी अचानक थांबवली संकर्षण कऱ्हाडेची गाडी; पुढे जे घडलं ते पाहून अभिनेता शॉक

‘धुरंधर 2’ मधून SP चौधरींचे पुनरागमन
एककीकडे या महागड्या भेटीची चर्चा असतानाच, दुसरीकडे संजय दत्तच्या आगामी चित्रपटाचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट येत्या 19 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात संजय दत्त पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय ‘एसपी अस्लम चौधरी’ या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये त्याचा अत्यंत आक्रमक आणि खतरनाक अवतार पाहायला मिळाला असून, चाहते या पुनरागमनासाठी सज्ज झाले आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number