Shantanu Moghe Emotional Post: प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक! सोशल मीडियावर पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाला महिना झाला असून पती शंतनु मोघेने पहिल्यांदाच सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. चाहत्यांचे आभार मानत त्याने प्रियांवरील प्रेम आणि आठवणी शेअर केल्या.

Shantanu Moghe Emotional Post: प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक! सोशल मीडियावर पहिल्यांदाच व्यक्त केल्या भावना

Shantanu Moghe Emotional Post:अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर एक महिना पूर्ण झाला आहे. 31 ऑगस्ट रोजी कॅन्सरमुळे तिचा अकाली निरोप घेतला. प्रियाचं अचानक जाण हे त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांसाठी खूप धक्कादायक ठरलं . या दुःखाच्या काळात तिचा नवरा, अभिनेता शंतनु मोघे, तिच्यासोबत राहून शेवटपर्यंत तिला सांभाळत होता. प्रिया गेल्यानंतर शंतनुने आपल्या भावना पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.

शंतनुने प्रियासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील दु:ख व्यक्त केले असून, चाहत्यांना त्यांच्या प्रेम आणि सहानुभूतीसाठी आभार मानले आहेत. त्याने आपल्या पोस्टमध्ये प्रियासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. विशेषतः फ्लाइटमध्ये घेतलेल्या त्यांच्या काही फोटोसह शंतनुने लिहिले की, ‘ज्यांनी फोन कॉल्स, ई-मेल्स, WhatsApp, X, Instagram, Facebook आणि इतर माध्यमांतून आमच्या कुटुंबासाठी प्रेम आणि आशीर्वाद व्यक्त केला, त्यांच्यासाठी ही कृतज्ञता पोस्ट आहे.’

शंतनुने पुढे लिहिले, ‘कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, चाहते आणि फॉलोअर्स, ओळखीचे आणि अगदी अनोळखी लोक, ज्यांनी आपली भावना इतक्या मनापासून व्यक्त केली, त्यांचे मनःपूर्वक आभार. तुमच्या प्रेमाने आणि काळजीने पुन्हा एकदा मानवतेवरचा विश्वास दृढ केला. God bless you all.’

शंतनुने प्रिया मराठेच्या व्यक्तिमत्त्वावर देखील प्रकाश टाकला. त्याने सांगितले की, प्रिया इतकी प्रेमळ, सकारात्मक आणि निर्मळ होती की तिच्या प्रत्येक कृतीतून, कलाकृतीतून, प्रेमातून आणि काळजीतून ती इतरांचे हृदय जिंकत असे. तिच्या वागणुकीतील संवेदनशीलता आणि दयाळूपणा प्रत्येकाला प्रभावित करायचा. शंतनुने लिहिले, ‘इतक्या प्रेमळ आणि सकारात्मक आत्म्याचा हा अकाली, दुर्दैवी आणि अनपेक्षित निरोप आमचे मन हेलावून गेला. पण तिचा प्रभाव अजूनही आम्हाला आणि तिच्या चाहत्यांना अनुभवायला मिळतो.’

पोस्टच्या शेवटी शंतनुने आपल्या भावनिक आभार व्यक्त केले आणि प्रिया मराठेच्या आठवणींना उजाळा दिला. त्याने लिहिले, ‘पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार, तुमच्या सारख्या सुंदर लोकांचे, जे नेहमी आमच्या सोबत उभे राहिलात सुखात आणि दुःखात. तुम्हा सर्वांना प्रेम आणि शुभेच्छा. देवांनो, तिची काळजी घेण्यात, तिला प्रेम करण्यात आता एकही चूक क्षमा केली जाणार नाही. My Angel, पुन्हा भेटू.’

या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये शंतनु मोघे आणि प्रिया मराठेच्या प्रेमाची आठवण ताजी झाली आहे. सोशल मीडियावर शंतनुची ही भावनिक पोस्ट चर्चेत आहे आणि अनेक चाहत्यांनी त्यांच्या प्रेमळ आठवणींना उजाळा दिला आहे. प्रिया मराठेच्या आठवणी नेहमीच त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत राहतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number