Mrs Universe 2025 : भारतासाठी एका अत्यंत गौरवास्पद क्षण अस्तित्वात आला आहे. शेरी सिंगने जागतिक सौंदर्य स्पर्धेच्या (Global Pageantry) इतिहासात देशाचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. फिलिपिन्समधील (Philippines) मनीला येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित 'Mrs Universe 2025' च्या अंतिम फेरीत शेरी सिंगला विजेतेपदाचा मुकुट (Crown) प्रदान करण्यात आला. जगभरातील 120 कर्तृत्ववान महिलांशी स्पर्धा करून शेरी यांनी भारतासाठी पहिला 'Mrs Universe' मुकुट मिळवला, ज्यामुळे ही रात्र राष्ट्रीय अभिमानाची, प्रेरणा आणि सक्षमीकरणाची ठरली.
जागतिक स्तरावर भारताचा ऐतिहासिक क्षण
मनीलामधील आलिशान 'ओकाडा' (Okada) येथे 'मिसेस युनिव्हर्स' ची 48 वी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सहभागींनी आत्मविश्वास, सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचे शानदार प्रदर्शन झाले. यात शेरी सिंगने आपल्या शांत उपस्थितीने, स्पष्ट वक्तृत्वाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी महिला सक्षमीकरण आणि मानसिक आरोग्याविषयीची जागरूकता या विषयांवर आपले मत प्रभावीपणे मांडले. या विजयामुळे भारताने केवळ इतिहासच घडवला नाही, तर कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मंचावर आपला वाढता प्रभाव पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
हेही वाचा - Bollywood Karwa Chauth : मीरा राजपूत, प्रियांका चोप्रा, क्रिती खरबंदासह अनेक अभिनेत्रींनी दाखवली हातावरची मेहंदी
स्पर्धेचे स्वरूप आणि परिणाम
मिसेस युनिव्हर्स ही विवाहित महिलांसाठी आयोजित केली जाणारी सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. या स्पर्धेत केवळ सौंदर्यच नव्हे, तर बुद्धिमत्ता, नेतृत्व क्षमता आणि सामाजिक योगदानाचेही कौतुक केले जाते. 2025 च्या या आवृत्तीमध्ये मानसिक आरोग्य, सामुदायिक कार्य आणि जागतिक ऐक्यावर विशेष भर देण्यात आला होता. शेरीने मानसिक आरोग्याविषयीची मांडलेली बाजू सकारात्मकत ठरली, ज्यामुळे तिला जगभरातून आदर आणि प्रशंसा मिळाली. या स्पर्धेत स्पर्धकांना त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वावर, सामाजिक कार्यावर आणि नेतृत्वाच्या गुणांवर तपासले जाते.
विजेत्यांची घोषणा आणि स्पर्धकांची नावे
यंदाच्या 'Mrs Universe 2025' चा अंतिम निकाल खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आला:
विजेती: भारत – शेरी सिंग
1ली उप-विजेती: सेंट पीटर्सबर्ग
2री उप-विजेती: फिलिपिन्स
3री उप-विजेती: आशिया
4थी उप-विजेती: रशिया
युएसए, जपान, म्यानमार, बल्गेरिया, यूएई, आफ्रिका आणि युक्रेन यांसारख्या राष्ट्रांच्या अंतिम स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, ज्यामुळे या स्पर्धेची जागतिक व्याप्ती आणि विविधता दिसून येते. प्रत्येक स्पर्धकाने आपले नेतृत्व आणि करुणा दाखवली, पण शेरीची सत्यता आणि शांतता खऱ्या अर्थाने लक्ष वेधून घेणारी होती. UMB Pageants च्या उर्मिला बोरुआ या राष्ट्रीय संचालक होत्या.
हेही वाचा - Kaun Banega Crorepati Junior: वडील ट्रेनमध्ये कोलगेट विकतात तर आई अगरबत्ती, लेकीने केबीसीमध्ये 90 सेकंदात 10 उत्तरं देऊन मिळवले पाच लाख