Palash Muchhal Controversy: ‘दुसऱ्या महिलेसोबत बेडवर रंगेहात पकडलं…’ गंभीर आरोपांवर पलाशने अखेर मौन सोडलं, म्हणाला ‘मी चुकीचं…’

स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं नियोजित लग्न रद्द झाल्यानंतर नवे आरोप समोर आले आहेत

Palash Muchhal Controversy: ‘दुसऱ्या महिलेसोबत बेडवर रंगेहात पकडलं…’ गंभीर आरोपांवर पलाशने अखेर मौन सोडलं, म्हणाला ‘मी चुकीचं…’

Palash Muchhal: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या नियोजित लग्नाबाबत काही महिन्यांपूर्वी मोठी चर्चा रंगली होती. नोव्हेंबर 2025 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना अचानक पूर्णविराम मिळाला. लग्न रद्द झाल्यानंतर या विषयावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून स्मृती मंधानाची बालपणीची मैत्रीण असल्याचा दावा करणाऱ्या विद्न्यान माने यांनी धक्कादायक आरोप केले आहेत.

विज्ञान माने यांनी आपण लग्नाच्या कार्यक्रमांना उपस्थित होतो, असा दावा करत पालाश मुच्छल यांच्यावर फसवणूक आणि विश्वासघाताचे आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नसोहळ्यादरम्यानच एक गंभीर प्रकार घडला असून त्यामुळे संपूर्ण कुटुंब आणि उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. या घटनेनंतरच लग्न रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र हे सर्व आरोप एकतर्फी असून याबाबत कोणताही अधिकृत पुरावा सार्वजनिकरित्या समोर आलेला नाही.

याचबरोबर विज्ञान माने यांनी आर्थिक फसवणुकीचे आरोपही केले आहेत. पालाश मुच्छल यांच्यासोबत एका चित्रपट प्रकल्पात गुंतवणूक केल्याचा उल्लेख करत, आपल्याला मोठ्या रकमेचा तोटा सहन करावा लागल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणी आपण पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. काही कलाकारांनाही त्यांच्या मानधनाबाबत अडचणी आल्याचे आरोप त्यांनी केले असून, संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे.

या गंभीर आरोपांनंतर पळाश मुच्छल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. त्यांनी सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावत, हे आरोप खोटे, तथ्यहीन आणि बदनामीच्या उद्देशाने केल्याचे म्हटले आहे. आपली प्रतिमा मलीन करण्यासाठीच हे आरोप करण्यात आले असून याप्रकरणी कायदेशीर मार्ग अवलंबला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या वकिलामार्फत योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

सध्या हे प्रकरण आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर असून सत्य काय आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. स्मृती मंधाना यांनी या संपूर्ण वादावर कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे क्रिकेटविश्व आणि मनोरंजन क्षेत्रात या प्रकरणाबाबत उत्सुकता वाढली आहे.

एकीकडे वैयक्तिक नातेसंबंध, तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार यांचा गुंता असलेल्या या वादावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम चित्र समोर येणार आहे. तोपर्यंत हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number