S. S. Rajamouli : ‘माझा देवावर विश्वास नाही’, पौराणिक कथांवर ब्लॉकबस्टर फिल्म बनवणाऱ्या राजामौलीवर नेटकरी संतापले

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे पौराणिक विषयांवर आधारित चित्रपट दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. मात्र त्यांचा देवावर विश्वास नाही.

S. S. Rajamouli : ‘माझा देवावर विश्वास नाही’, पौराणिक कथांवर ब्लॉकबस्टर फिल्म बनवणाऱ्या राजामौलीवर नेटकरी संतापले

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे पौराणिक विषयांवर आधारित चित्रपट दिग्दर्शनासाठी ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ज्यामध्ये आरआरआर , बाहुबली: द बिगिनिंग आणि बाहुबली २: द कन्क्लुजन,छत्रपति यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटात मुख्यत: महादेव, श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान यांसारख्या देवदेवतांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत.

पौराणिक आणि देवदेवतांवर चित्रपट निर्माते दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे त्यांच्या खऱ्या आयुष्यात देवाला मानतच नाही. एवढचं नाही तर ते देवाला माननाऱ्यांचा किंवा त्यांना देवाबद्दल काही पटवून देणाऱ्यांचा तिरस्कार करतात. अस त्यांनी स्वत: सांगितलं आहे. हैदराबादमध्ये नुकताच पार पडलेला 'वाराणसी' चित्रपटाचा कार्यक्रम सध्या चर्चेत आला आहे. दक्षिण भारतातील लोकप्रिय चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांनी यानिमित्त हैदराबादमध्ये एका भव्य "ग्लोबेट्रोटर" कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा यांच्या "वाराणसी" या चित्रपटाचे शीर्षक जाहीर करण्यात आले.

या कार्यक्रमात राजामौली यांनी खुलासा केला की, ते देवाला मानतच नाही. यावेळी ते म्हणाले की, "माझा देवावर विश्वास नाही. माझ्या वडिलांनी सांगितलं की हनुमान सर्व गोष्टी सांभाळून घेतात. माझ्या वडिलांनी यशासाठी हनुमानाचा आशीर्वाद घेण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळेस मला ती गोष्ट पटली नाही आणि मला त्या गोष्टीचा राग देखील आला. अशा प्रकारे गोष्टी सांभाळता येतात का? माझी पत्नी तर हनुमानाची एवढी मोठी भक्त आहे की, ती त्यांच्यासोबत बोलते. तिच्या या वागण्याचा देखील मला राग आला होता" .

"लहानपणापासूनच मी अनेकदा रामायण आणि महाभारत यांचं माझ्यासाठी काय महत्त्व आहे आणि त्यासंदर्भात माझी काय स्वप्नं आहे, याबद्दल बोलत आलोय. रामायणातील एका महत्त्वाच्या भागाचं इतक्या लवकर चित्रीकरण करण्याची संधी मला मिळेल असं मी कधीच स्वप्नात पाहिलं नव्हतं. यातील प्रत्येक दृश्य आणि प्रत्येक संवाद लिहिताना मला असं वाटत होतं की मी एका वेगळ्यात विश्वात आहे." राजामौलींची ही व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. देवावर विश्वास नसल्याचं म्हणणाऱ्या राजामौलींवर काहींनी रागसुद्धा व्यक्त केला आहे. 

हेही वाचा- Sherlyn Chopra : शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत, शस्त्रक्रियेबद्दल दिली माहिती,चाहतेही गोंधळात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number