Sunday, July 13, 2025 10:58:16 AM

सुनीताने नावातून काढून टाकले गोविंदाचे आडनाव; घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण

सुनीता आहुजाने तिच्या नावातून गोविंदाचे आडनाव काढून टाकले आहे. सुनीताच्या या कृतीमुळे आता दोघांच्या घटस्फोटोसंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे.

सुनीताने नावातून काढून टाकले गोविंदाचे आडनाव  घटस्फोटाच्या चर्चांना पुन्हा उधाण
Sunita removes Govinda surname
Edited Image

Sunita Removes Govinda Surname: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदाच्या पत्नीने काही महिन्यांपूर्वी खुलासा केला होता की ती सुपरस्टारपासून वेगळी राहत आहे. या खुलाशानंतर, 61 वर्षीय गोविंदा आणि सुनीता यांच्यात सर्व काही ठीक नसल्याची चर्चा होती. आता पुन्हा एकदा सुनीताने असे काही केले आहे, ज्यामुळे तिचे गोविंदासोबतचे नाते चर्चेचा विषय बनले आहे. सुनीता आहुजाने तिच्या नावातून गोविंदाचे आडनाव काढून टाकले आहे. सुनीताच्या या कृतीमुळे आता दोघांच्या घटस्फोटोसंदर्भातील चर्चांना उधाण आलं आहे. 

सुनीताने नावातून काढून टाकले गोविंदाचे आडनाव - 

गोविंदाची पत्नी सुनीताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या नावातून आहुजा आडनाव काढून टाकले आहे. यासोबतच तिने तिच्या नावात आणखी एक बदल केला आहे. तिने तिच्या नावात आणखी एक S जोडला आहे. तिने नावात केलेल्या या बदलामुळे सोशल मीडिया वापरकर्ते ते दोघे वेगळे होत आहेत का? असा प्रश्न विचारत आहेत. 

हेही वाचा - ‘लाडकी बहीण योजना’वर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; गौतमी पाटील आणि अण्णा नाईक मुख्य भूमिकेत

सुनीताने सांगितलं आडनाव काढून टाकण्यामागील कारण - 

तथापी, सुनीता यांनी वापरकर्त्यांना पडलेल्या प्रश्नाला स्वतः उत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर गोविंदाचे आडनाव तिच्या नावातून काढून टाकल्यानंतर, सुनीताने म्हटलं आहे की, ' मी आहुजा होते आणि नेहमीच राहील'. आहुजा आडनाव काढून टाकल्यानंतर घटस्फोटाच्या अफवांना वेग येऊ लागताच, सुनीता यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, ती गोविंदापासून वेगळे होत नाही. मी आहुजा आहे आणि हे कधीही बदलणार नाही. जेव्हा मी हे जग सोडून जाईल, तेव्हाच आडनाव काढून टाकले जाईल. मी माझ्या नावातून आहुजा काढून टाकला आहे. मी पहिल्या नावासोबत एक अतिरिक्त S जोडला आहे. मी हे अंकशास्त्रामुळे केले आहे. मलाही नाव-प्रसिद्धी हवी आहे, असं सुनीताने म्हटलं आहे. 

हेही वाचा - Sidhu Moosewala Murder: सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा खुलासा; आरोपी गोल्डी बरारचा खळबळजनक कबुलीजबाब

दरम्यान, गोविंदासोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना सुनीता यांनी स्पष्ट केलं की, 'आम्ही एक आनंदी कुटुंब आहोत. जोपर्यंत आम्ही थेट काही सांगत नाही तोपर्यंत काहीही विचार करू नका. निरर्थक गोष्टींवर विश्वास ठेवू नका. मला आणि गोविंदाला कोणीही वेगळे करू शकत नाही.'
 


सम्बन्धित सामग्री