Saturday, December 06, 2025 12:01:58 PM

Sushmita Sen: हृदयशस्त्रक्रियेवेळी सुश्मिता सेनची अवस्था होती अत्यंत वाईट अवस्था, भयानक अनुभव शेअर केला

सर्जरीत तिने बेशुद्ध होण्यास नकार देत डॉक्टरांशी बोलत प्रक्रिया पूर्ण केली. ‘आर्या 3’ च्या सेटवरील जबाबदारीमुळे ती लवकर बरी होऊ इच्छित होती, असा भावनिक खुलासा तिने केला.

sushmita sen हृदयशस्त्रक्रियेवेळी सुश्मिता सेनची अवस्था होती अत्यंत वाईट अवस्था भयानक अनुभव शेअर केला

मुंबई: बॉलिवूडची दमदार अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन हिच्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक क्षणांपैकी एक म्हणजे तिला आलेला फेब्रुवारी 2023 मधील हृदयविकाराचा झटका. ‘आर्या 3’च्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या या घटनेने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा तिच्या धमन्यांमध्ये तब्बल 95% ब्लॉकेज असल्याचं समोर आलं आणि तातडीने हार्ट सर्जरीची गरज भासली. नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत सुष्मिताने त्या काळातील अनुभवाचा सखोल भावनिक खुलासा केला आहे.

तिच्या मते, सर्जरी सुरू असतानाही तिला बेशुद्ध करणार नाही, अशी तिची स्पष्ट भूमिका होती. कारण काय? ती म्हणाली “मला सर्व काही माझ्या डोळ्यांनी पाहायचं होतं. बेशुद्ध राहणं मला अजिबात पसंत नाही.” सुष्मिता पुढे म्हणाली, “डॉक्टरांनी सांगितलं की वेदना कमी करण्यासाठी मला भूल द्यावी लागेल, पण मी नकार दिला. कारण मला शुद्धीत राहून सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. त्या क्षणी माझ्याकडे दोनच पर्याय होते, एकतर जागी राहून संघर्ष करणे किंवा बेशुद्ध होऊन कायमची डोळे मिटण्याचा धोका. मी संघर्षाचा मार्ग निवडला… आणि त्यातूनच मी वाचले.”

हेही वाचा: Bihar Assembly Dissolution: सत्तास्थापनेसाठी धावपळ सुरू, नितीश कुमारांनी घेतली राज्यपालांची भेट; 19 नोव्हेंबरला बरखास्त होणार विधानसभा

सर्जरीदरम्यान ती डॉक्टरांशी सतत बोलत होती. “लवकर ऑपरेशन करा… मला सेटवर परत जायचं आहे,” असं ती पुन्हा पुन्हा सांगत होती. कारण तिच्या अनुपस्थितीमुळे 500 पेक्षा जास्त लोकांचे काम थांबले होते. “मुख्य भूमिका असणं म्हणजे मोठी जबाबदारी असते. माझ्यासाठी नव्हे, माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येकाच्या उदरनिर्वाहासाठी मला लवकर बरे होणं आवश्यक होतं,” असं ती भावनिकपणे म्हणाली. वेदना सहन करत, मनोबल सांभाळत, सुष्मिताला पूर्ण बरं होण्यासाठी साधारण 15 दिवस लागले. त्यानंतर तिला ‘आर्या’च्या सेटवर परतण्याची परवानगी मिळाली आणि तिच्या जबरदस्त कमबॅकने चाहत्यांची वाहवा मिळवली.

‘आर्या’ मालिकेचा तिसरा सीझन आणि त्याचा दुसरा भाग ओटीटीवर चांगलाच गाजला. आजही सुष्मिताचे अनेक चित्रपट आणि तिची अदाकारी प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात. सुष्मिताची ही कहाणी केवळ साहसाची नाही, तर जीवनाशी केलेल्या एका कठीण झुंजीची आहे, जी लाखो लोकांना प्रेरणा देणारी ठरते.

हेही वाचा: Weight Loss Surgery: प्रेयसीच्या कुटुंबासाठी वजन कमी करायला गेला अन् भलतचं घडलं; शस्त्रक्रियेदरम्यान झाला 36 वर्षीय प्रियकराचा मृत्यू

 

सम्बन्धित सामग्री