Bigg Boss Marathi Season 6 Winner: ‘आले होते तन्वी कोलते म्हणून, जातेय…’ 100 दिवसांच्या संघर्षानंतर ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये कोकणकन्येची दमदार बाजी; ट्रॉफी जिंकल्यावर रितेशने दिली खास भेटवस्तू

बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात तन्वी कोलते विजेती ठरली.

Bigg Boss Marathi Season 6 Winner: ‘आले होते तन्वी कोलते म्हणून, जातेय…’ 100 दिवसांच्या संघर्षानंतर ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये कोकणकन्येची दमदार बाजी; ट्रॉफी जिंकल्यावर रितेशने दिली खास भेटवस्तू

मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाचा थरार अखेर संपला असून या सिझनची विजेती म्हणून कोकणातील तन्वी कोलते हिने बाजी मारली आहे. तब्बल 100 दिवस चाललेल्या या स्पर्धेत तन्वीने दमदार खेळ करत प्रेक्षकांची मनं जिंकली आणि ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं. यंदाच्या सिझनमध्ये विशाल कोटीयन, राकेश बापट, अनुश्री माने आणि दीपाली सय्यद यांसारखे ताकदीचे स्पर्धक होते. मात्र अंतिम फेरीत सर्वाधिक मतं मिळवत तन्वीने विजेतेपद पटकावलं, तर राकेश बापट उपविजेता ठरला.

शोच्या सुरुवातीपासूनच तन्वी चर्चेत राहिली. पहिल्या आठवड्यात तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि ठाम भूमिकेमुळे ती घरातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरली होती. सुरुवातीला तिच्यावर ‘जास्त बोलते’ अशी टीकाही झाली; मात्र पुढे तिच्याच संवादशैलीने आणि टास्कमधील आक्रमक खेळाने तिला वेगळी ओळख मिळवून दिली. घरात तिने ‘टास्क क्वीन’ म्हणून स्वतःची प्रतिमा तयार केली आणि प्रत्येक आव्हान धैर्याने स्वीकारत ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 6 : ग्रँड फिलानेचं पहिलं एलिमिनेशन समोर? टॉप 5 च्या शर्यतीतून विजेतेपदाचा सर्वात स्ट्रॉग स्पर्धक घराबाहेर

विजेतेपद पटकावल्यानंतर तन्वीला ट्रॉफीसह 15 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. याशिवाय इतर आकर्षक बक्षिसांमध्ये व्हाउचर आणि ई-बाईकचाही समावेश आहे. विशेष म्हणजे शोचे सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनी तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची खास फ्रेम भेट म्हणून दिली, ज्यामुळे हा क्षण अधिकच खास ठरला.

विजयानंतर भावना व्यक्त करताना तन्वी म्हणाली की, हा क्षण तिच्यासाठी स्वप्नपूर्तीचा आहे. “मी घरात पाऊल टाकल्यापासून ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पाहत होते. पण हे स्वप्न मी खूप आधीपासून पाहिलं होतं. या मंचामुळे मला माझ्या नावाने ओळख मिळाली. आज मी केवळ एक कलाकार नाही, तर ‘तन्वी कोलते’ हा ब्रँड बनून बाहेर पडत आहे,” असे ती म्हणाली. तसेच तिने चाहत्यांचे मनापासून आभार मानले.

हेही वाचा: Bhooth Bangla Box Office Day 2 : अक्षय-प्रियदर्शन जोडीची जादू कायम; 2 दिवसांतच कमावले इतके, लवकरच गाठणार 100 कोटींचा टप्पा

कोकणातील साध्या कुटुंबातून आलेली तन्वी आधीपासूनच अभिनय क्षेत्रात कार्यरत होती. लक्ष्मी निवास या मालिकेतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली. मात्र ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी होण्यासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला आणि हा निर्णय तिच्यासाठी यशस्वी ठरला.

या सिझनमध्ये तन्वीचा प्रवास केवळ स्पर्धेपुरता मर्यादित नव्हता, तर तिच्या व्यक्तिमत्त्वातील बदल, आत्मविश्वास आणि जिद्द यांचा प्रवासही प्रेक्षकांनी पाहिला. सुरुवातीला टीकेचा सामना करणारी तन्वी शेवटी प्रेक्षकांची आवडती बनली आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. ‘बिग बॉस मराठी 6’च्या या ग्रँड फिनालेनंतर तन्वीच्या पुढील कारकिर्दीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या यशानंतर तिच्या वाटचालीला नवी दिशा मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number