Tuesday, November 11, 2025 10:39:35 PM

Rajat Bedi Daughter : रजत बेदीच्या मुलीचा सोशल मीडियावर जलवा! पण लोकप्रियतेमुळे वाढली चिंता

बॉलिवूड अभिनेता रजत बेदी आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेब सीरिजमधून पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत झळकले आहे. त्यांच्या पुनरागमनासोबतच आता त्यांची मुलगी वीरा बेदीही चर्चेचा विषय ठरली आहे.

rajat bedi daughter  रजत बेदीच्या मुलीचा सोशल मीडियावर जलवा पण लोकप्रियतेमुळे वाढली चिंता

मुंबई: बॉलिवूड अभिनेता रजत बेदी आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेब सीरिजमधून पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत झळकले आहे. रजत बेदीच्या पुनरागमनासोबतच आता त्याची मुलगी वीरा बेदीही चर्चेचा विषय ठरली आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेब सीरिजच्या स्क्रिनिंगदरम्यान लोकांनी पहिल्यांदाच वीरा बेदीला पाहिलं. यादरम्यान, तिच्या सौंदर्याने सर्वांनाच भुरळ घातली. यादरम्यान, काहींनी तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि ऐश्वर्या रायसोबत केली. वीरा बेदीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे.  

मात्र, या लोकप्रियतेसोबत, रजत बेदी चिंतेत आहेत. एका मुलाखतीदरम्यान रजत बेदी म्हणाले की, 'मला माझ्या मुलीचा अभिमान आहे, पण तेवढीच काळजीही वाटते. काही लोक एआयच्या मदतीने माझ्या मुलीचे फोटो तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. त्यामुळे, ती प्रचंड घाबरली आहे. वीरा अजून शिक्षण घेत आहे आणि अभिनय क्षेत्रात येण्याची घाई नाही. पण तिची वाढती प्रसिद्धी आणि चाहत्यांचा उत्साह पाहून मला खूप आनंद होत आहे'. वीराच्या फॅन फॉलोइंगने बॉलिवूडमधील स्टारकिडची एंट्री जाहीर केली आहे. मात्र, या लोकप्रियतेमागे तिची काळजी आणि आव्हानेही दडलेली आहेत. 

काही महिन्यांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारनेही सायबर गुन्ह्यांशी संबंधित एका घटनेचा अनुभव शेअर केला. 'काही महिन्यांपूर्वी माझी 13 वर्षांची मुलगी मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळत होती. यादरम्यान, तिला एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला आणि त्याने माझ्या मुलीकडून न्यूड फोटोंची मागणी केली. त्यामुळे ती प्रचंड घाबरली आणि तिने व्हिडिओ गेम खेळणे थांबवले. तसेच, हा घडलेला प्रकार तिने माझ्या पत्नीला सांगितलं. ही घटना सायबर गुन्हेगारीचा एक भाग आहे'.

रजत बेदीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दो हजार एक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. यानंतर, रजत बेदी यांनी जोडी नंबर 1 (2001) चित्रपटात काम केले. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या राकेश रोशन दिग्दर्शित 'कोई मिल गया' चित्रपटात रजत बेदीने राज सक्सेनाची भूमिका साकारली. या चित्रपटातून रजत बेदी लोकप्रिय झाला. त्यानंतर, रजत बेदींनी रख्त (2004), खामोश... खौफ की राज (2005) आणि रॉकी - द रिबेल (2006) यासह जवळपास 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.


सम्बन्धित सामग्री