Ramayana Trailer Release : ब्रम्हमुहूर्तावर ‘रामायण’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज! प्रभू श्रीरामांची दिव्य झलक, लंकापती रावणाचे रौद्ररुप तर हनुमानाकडे नजरा खिळवल्या

अखेर ज्या क्षणाची प्रतिक्षा अवघ्या देशवासीयांना लागली होती त्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज गुरुवारी 30 जुलैला पहाटे 4.15  या ब्रम्हमुहूर्तावर जगभरात प्रदर्शित झाला आहे.

Ramayana Trailer Release : ब्रम्हमुहूर्तावर ‘रामायण’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलीज! प्रभू श्रीरामांची दिव्य झलक, लंकापती रावणाचे रौद्ररुप तर हनुमानाकडे नजरा खिळवल्या

अखेर ज्या क्षणाची प्रतिक्षा अवघ्या देशवासीयांना लागली होती त्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज गुरुवारी 30 जुलैला पहाटे 4.15  या ब्रम्हमुहूर्तावर जगभरात प्रदर्शित झाला आहे. नितेश तिवारी यांच्या रामायण या चित्रपटाची सर्वजण मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अशातच त्यांच्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या नजरा चित्रपटासाठी खिळवल्या आहेत. हा चित्रपट या दिवाळीत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. 

दरम्यान ‘रामायण’ या चित्रपटात बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे कलाकार एकत्र दिसणार आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीलाच चित्रपटातील विलन अर्थात लंकापती रावणाचा रौद्ररुप पाहायला मिळाला आहे. ट्रेलरची सुरुवात यशच्या रावणाच्या दमदार एन्ट्रीने होते. दशनन रावणाच्या शक्तिशाली अवताराची भव्यता स्पष्टपणे दिसून येते. त्याच्या लूकमधील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे, निर्मात्यांनी तो अजिबात अतिनाटकीय करण्याचा प्रयत्न केलेला नाही. काहीही भडक वाटत नाही. दाक्षिणात्य सुपरस्टार यश या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा- Karishma Tanna: गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; 42व्या वर्षी मुलाला दिला जन्म

तर प्रभू रामाच्या भूमिकेत बॉलीवूडमधील स्टार अभिनेता रणबीर कपूर पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये प्रभू श्रीरामांची दिव्य झलक पाहायला मिळाली आहे. तर सई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारत आहे. याशिवाय, सनी देओल हनुमानाची भूमिका साकारत आहे, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचसोबत अरुण गोविल, लारा दत्ता, रकुल प्रीत सिंग, विवेक ओबेरॉय आणि कुणाल कपूर यांचाही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत समावेश आहे.

नितेश तिवारी यांच्या 4000 कोटींच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधलं आहे. रामायणाची ही झलक भव्य, अलौकिक आणि चित्तथरारक आहे. हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित असलेला हा चित्रपट एक नेत्रसुखद अनुभव आहे. टीझर पाहून निराश झालेल्यांना दिग्दर्शकाने तक्रार करायला कोणतीही संधी दिलेली नाही. एकंदरीत, निर्माता नमित मल्होत्रा ​​आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ हा चित्रपट जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी सज्ज आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number