Zubeen Garg Postmortom Report: सिंगापूरमध्ये निधन झालेल्या आसामच्या प्रख्यात गायक-संगीतकार जुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबतचे सत्य अखेर समोर आले आहे. सिंगापूर पोलीस दलाने (SPF) प्राथमिक तपास पूर्ण करून शवविच्छेदन अहवाल भारतीय उच्चायुक्तालयाला सादर केला आहे. या अहवालानुसार, गर्ग यांच्या मृत्यूत कोणताही संशयास्पद प्रकार किंवा घातपात आढळून आलेला नाही.
शवविच्छेदन अहवालात काय आहे?
अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, जुबीन गर्ग यांचा मृत्यू स्कूबा डायव्हिंगमुळे नव्हे तर पोहताना बुडून झाला आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या मृत्युपत्रातदेखील मृत्यूचे कारण ड्राऊनिंग असे नोंदवण्यात आले आहे.
हेही वाचा - Kaun Banega Crorepati : महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पोराची कमाल, लाईफलाईनच्या मदतीशिवाय KBC मध्ये जिंकले 50 लाख
मृत्यूचा घटनाक्रम
दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी गर्ग यांना बेशुद्ध अवस्थेत पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यावेळी ते मित्रांसोबत एका नौकेवर होते. माहितीप्रमाणे, त्यांनी आपले लाईफ जॅकेट काढून पुन्हा पाण्यात उडी मारली, त्यानंतर ते पाण्यातून वर आले नाहीत. तातडीने त्यांना सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा - Shahrukh Khan : शाहरुख खान ठरला जगातील श्रीमंत अभिनेता, हजारो कोटी संपत्तीचा आहे मालक
सिंगापूर पोलिसांनी भारतीय उच्चायुक्तालयाला दिलेल्या अहवालात नमूद केले आहे की, जुबीन गर्ग यांच्या मृत्यूत कोणताही गुन्हेगारी कट अथवा घातपात झाल्याचे पुरावे नाहीत. त्यामुळे या घटनेला दुर्दैवी अपघात असे संबोधले जात आहे. जुबीन गर्ग हे केवळ आसाममध्येच नव्हे तर संपूर्ण भारतभर लोकप्रिय होते. त्यांच्या अचानक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. संगीत विश्वाने एक बहुमुखी कलाकार गमावला असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.