सध्या नेटफ्लिक्स वर अनेक प्रकारच्या थरारक सिनेमा प्रदर्शित होत आहेत. चित्रपटाच्या कथेपासून ते अनुभवी कलाकार आणि चित्रपटाची उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीपासून अनेक अनेक गोष्टी एकदम उत्तम प्रकारे आहेत. यातील काही चित्रपट अश्या आहेत ज्यांना पाहून तमाम रसिकप्रेक्षकांनी या चित्रपटांचे त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुकाचा वर्षाव करत आहेत. इतकेच नाही तर या चित्रपटांना पाहून पुन्हा एकदा याच चित्रपटांना आवर्जून पाहत आहेत. चला तर जाणून घेऊया ते चित्रपट जे सस्पेन्स-थ्रिलरयुक्त चित्रपट आहेत आणि त्यासोबतच तुमची रात्रीची झोपदेखील उडू शकते.
१ - सिकंदर का मुकद्दर:
सिनेमाची सुरुवात मुंबईतील एका मोठ्या इव्हेंटपासून होते जिथे एक भव्य एक्झिबिशन सुरु होणारच असते. मात्र एवढ्यातच एक्झिबिशनमधील साठ कोटी रुपयांची चोरी झाल्याची बातमी निदर्शनास येते आणि त्यामुळे सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होते. चोरी झाल्याची बातमी समजताच पोलिसदेखील घटनास्थळी येऊन सर्वांसोबत कसून चौकशी होते. मात्र सर्वजण आपण चोरी नाही केली असा दावा वारंवार करतात. ज्यामुळे पोलीस याची जबाबदारी जसविंदर सिंहवर (जिमी शेरगील) याला देण्यात येते. आणि इथूनच चित्रपटाला वेगवेगळे वळण येण्यास सुरुवात होते. या चित्रपटात जिथे अभिनेता जिमी शेरगील याने जसविंदर सिंहवरची भूमिका साकारली आहे ज्यामध्ये तो आपल्याला पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळतो तर अविनाश तिवारी याने सिकंदर शर्माची भूमिका साकारली आहे आणि त्यासोबतच तमन्ना भाटियाने कामिनी सिंहची भूमिका साकारली आहे.
हेही वाचा: स्वप्नांची पूर्तता वयावर नाही, जिद्दीवर ठरते!– प्राजक्ता माळीचा महिलांना सल्ला
२ - फिर आई हसीन दिलरुबा:
रोमान्स, सस्पेन्स आणि थ्रिलरने परिपूर्ण या चित्रपटांत 'विक्रांत मेस्सी' रिशभ सक्सेना याची भूमिका साकारत आहे आणि 'तापसी पन्नू' राणी कश्यपची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात आणि नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि ते म्हणजे जिम्मी शेरगिल आणि सनी कौशल यांची या चित्रपटामध्ये एन्ट्री होते. ज्यामध्ये जिम्मी शेरगिल आपल्याला मोंटू चाचा यांची भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे ज्यामध्ये ते रिषभच्या काकांची भूमिका साकारत आहेत तर सनी कौशल आपल्याला अभिमन्यु पंडित याची भूमिका साकारत आहे.
चित्रपटाची सुरुवात आग्र्यापासून होते. जिथे रिषभ आणि राणी यांच्यावर नीलला जीवे मारल्याचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे ते दोघे फरार होतात आणि आग्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करतात. राणी ब्युटी पार्लरचा व्यवसाय करत असते, रिषभ डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आणि त्याचा एक हात कृत्रिम असतो. दोघे वेगवेगळ्या फोन नंबरवरून एकमेकांच्या संपर्कात राहतात. रिशभने नुकताच राणीसोबत थायलंडला कायमस्वरूपी जाण्यासाठी विमानाची तिकिटे बुक करतो आणि फरार होण्याची तयारी सुरु असतानाच एसीपी किशोर रावत राणी कश्यप यांना पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी बोलावतात. तेव्हा मोंटू चाचा तिथे येतात आणि राणी कश्यपला भेटून रिषभ कुठे आहे याची चौकशी करतात. तेव्हा राणी त्यांना म्हणते, मला काहीच कल्पना नाही आहे की रिषभ कुठे आहे. तेव्हा मोंटू चाचा राणीला म्हणतात, 'रिशू पाताळात जरी लपला असेल तर मी त्याला पाताळातून सुद्धा शोधून काढेल. अश्याप्रकारे शेवट्पर्यंत चित्रपटांत वेगवेगळे वळण येण्यास सुरुवात होते. मुख्य गोष्ट म्हणजे रिषभ आणि राणी 'दिनेश पंडित' यांच्या 'कसोली का केहेर', 'मगरमच का शतरंज' अश्या विविध पुस्तक वाचून कसे ते या संकटातून बाहेर पडतात हे या चित्रपटांत दाखवले आहे.
हेही वाचा: विराट कोहलीची फूड डायरी- 'हे' आहेत आवडते रेस्टॉरंट्स!
३ - दो पत्ती:
२०२४ ला नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला या सस्पेन्स आणि थ्रिलरयक्त चित्रपटांत आपल्याला काजोल, शाहीर शेख आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट घरगुती अत्याचारावर आधारित आहे. काजोल इन्स्पेक्टर विद्या ज्योती यांची भूमिका साकारत आहे तर शाहीर शेख ध्रुव सूद याची भूमिका साकारत आहे ज्यामध्ये तो सौम्याचा नवरा आणि शैलीचा माजी प्रियकर अशी भूमिका साकारत आहे. क्रिती सेनन सौम्या सूद आणि शैली या दोन जुळ्या बहिणींची भूमिका साकारत आहेत तर तन्वी आझमी सौम्या आणि शैली या जुळ्या बहिणींच्या केअर टेकरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची सुरुवात उत्तराखंडमधील देवीपूर गावातील पोलिस ठाण्यापासून होते. पोलीस ठाण्यामध्ये सौम्या ध्रुवसमोर इन्स्पेक्टर विद्या ज्योती यांच्याकडे ध्रुव आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करत होता अशी तक्रार करते. मग हि कथा एक जुन्या घटनेकडे वळण घेते जेव्हा इन्स्पेक्टर विद्या ज्योती यांना घरगुती छळाबद्दल फोन येतो. जेव्हा ती तिच्या घरी जाते तेव्हा इन्स्पेक्टरला असे काहीही घडले नाही. तुम्हाला गैरसमज झाला असेल असे सांगण्यात येते आणि इथूनच या चित्रपटाची सुरुवात होते आणि चित्रपटाला वेगवेगळे वळण येण्यास सुरुवात होते.