Punjab Flood: पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बॉलिवूड कलाकार पुढे येत आहेत. यामध्ये अक्षय कुमारचे योगदान खास ठरले आहे. अभिनेता अक्षय कुमारने राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य खरेदी करण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला. याआधी पंजाबी कलाकार एमी विर्कने 200 गावे दत्तक घेतली होती, तर शहनाज गिल, सोनू सूद, दिलजीत दोसांझ आणि इतर कलाकारही मदत साहित्य पोहोचवत आहेत आणि लोकांना मदतीस पुढे येण्याचे आवाहन करत आहेत. पंजाब सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सुमारे 1655 गावे या पूरामुळे प्रभावित झाली आहेत.
अक्षय कुमारने सांगितले की, 'मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. हो, मी पंजाब पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य खरेदी करण्यासाठी 5 कोटी रुपये देत आहे, पण हे दान नाही. जेव्हा मला मदतीचा हात पुढे करण्याची संधी मिळते तेव्हा मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझ्यासाठी, ही माझी सेवा आहे, माझे खूप छोटेसे योगदान आहे.'
हेही वाचा - Ganesh Visarjan 2025: मुंबईत गणेश विसर्जनावर 'या' अभिनेत्रीने व्यक्त केला संताप; नेटिझन्सचा पलटवार; ‘असे लोक मुंबईत राहण्याच्या लायकीचे ...
पंजाबमधील माझ्या भावा-बहिणींवर आलेली नैसर्गिक आपत्ती लवकर दूर व्हावी अशी मी प्रार्थना करतो. देव त्यांना आशीर्वाद देवो, असंही अक्षय कुमाने म्हटलं आहे. संकटाच्या काळात अक्षय सतत मदतीस पुढे येत आहे. कोविड-19 महामारीच्या वेळी त्यांनी ‘भारत के वीर’ उपक्रमाद्वारे सैनिकांच्या कुटुंबियांना मदत केली होती.
हेही वाचा - Jaya Bachchan: जया बच्चन यांनी दगडूशेठ बाप्पाला अर्पण केले होते सोन्याचे कान, अमिताभसाठी केलेला नवस; कारण ऐकून थक्क व्हाल
याशिवाय, दिलजीत दोसांझ, सोनू सूद, रणदीप हुड्डा, गिप्पी ग्रेवाल, हिमांशी खुराणा, जसबीर जस्सी, करण औजला, गुरु रंधावा आणि एमी विर्क यांनीही वेगवेगळ्या प्रकारे पंजाबला मदत केली आहे. शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांनी ‘मेहेर’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई पंजाब पूरग्रस्तांसाठी दान करणार असल्याची घोषणा केली आहे. कलाकारांच्या या प्रयत्नांमुळे पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हातभार लागत आहे.