Sunday, February 09, 2025 05:20:24 PM

Bollywood actors have received death threats
कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसोझा आणि सुगंधा मिश्रा यांना धमकीचा मेल

थेट पाकिस्तानमधून मेल करत बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

कपिल शर्मा राजपाल यादव रेमो डिसोझा आणि सुगंधा मिश्रा यांना धमकीचा मेल

मुंबई : बॉलिवूडमध्ये सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अभिनेता कपिल शर्मा, सुगंधा मिश्रा, कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि अभिनेता राजपाल यादव यांना धमकीचे मेल मिळाल्याने बॉलिवूडमध्ये चिंता वाढली आहे.

धमकीच्या मेलमध्ये नेमकं काय?
धमकीचा मेल "विष्णू" नावाच्या व्यक्तीकडून पाठवण्यात आला आहे.
मेलमध्ये लिहिलं आहे की, "आमच्याकडे तुमच्या दैनंदिन जीवनाची सर्व माहिती आहे. हा कोणताही पब्लिसिटी स्टंट नाही. पुढील 8 तासांत उत्तर द्या, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.

प्राथमिक तपासानुसार, हा मेल थेट पाकिस्तानातून पाठवला असल्याचा संशय आहे.या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ FIR दाखल केली असून, IP अॅड्रेसद्वारे धमकी पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. कलाकारांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष पाऊले उचलली जात आहेत.

बॉलिवूडमधील खळबळ!
सैफ अली खानवर हल्ल्याच्या घटनेनंतर आता या धमकीच्या मेलमुळे बॉलिवूड कलाकारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांचा तपास लवकरच या प्रकरणाचा उलगडा करेल. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


सम्बन्धित सामग्री