CJP Protest : विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरली अन् स्वतःच फसली; अभिनेत्रीच्या अडचणी वाढल्या, नेमकं काय घडलं?

आंदोलनादरम्यान अभिनेत्यांरीच्या हातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक आक्षेपार्ह चित्र असलेले पोस्टर दिसून आले.

CJP Protest :  विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरली अन् स्वतःच फसली; अभिनेत्रीच्या अडचणी वाढल्या, नेमकं काय घडलं?

CJP Protest :  'नीट' (NEET) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून देशभरात संतापाची लाट पसरली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत 'सीजेपी'च्या बॅनरखाली कोलकात्यात 24 जुलै रोजी प्रचंड मोठे आंदोलन छेडण्यात आले होते. या निदर्शनांमध्ये विद्यार्थ्यांसोबतच अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली होती. मात्र, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्रीलेखा मित्रा आता स्वतःच एका मोठ्या वादात सापडल्या आहेत.

पंतप्रधान मोदींविरोधातील 'ते' पोस्टर ठरले वादाचे कारण
आंदोलनादरम्यान श्रीलेखा मित्रा यांच्या हातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक आक्षेपार्ह चित्र असलेले पोस्टर दिसून आले. या प्रकारानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. भाजप प्रवक्त्या केया घोष यांनी याप्रकरणी आनंदपूर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली आहे. याशिवाय बिधाननगर सायबर क्राईम, बारुईपूर आणि शांतीपूर येथील पोलीस ठाण्यांमध्येही अभिनेत्रीविरोधात तक्रारींचा पाऊस पडला आहे. पोलिसांनी सर्व तक्रारींची नोंद घेतली असून चौकशीअंती पुढील पावले उचलली जातील, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Mansi Kulkarni Dwidha Movie : रिअल ते रील…, ‘द्विधा' मध्ये झळकणार मानसी कुलकर्णी आणि तिची लेक !

"मला ट्रॉल करून धमक्या दिल्या जात आहेत"; अभिनेत्रीचा गंभीर आरोप
चौफेर कायदेशीर वेढा वाढल्यानंतर श्रीलेखा मित्रा यांनी आपली बाजू मांडताना खळबळजनक दावे केले आहेत. "माझ्याविरोधात रचला गेलेला हा एक कट आहे. मला फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून सोशल मीडिया व मेसेंजरवर अश्लील भाषेचा वापर करून वैयक्तिक पातळीवर लक्ष्य केले जात आहे," असा आरोप त्यांनी केला. एकीकडे आंदोलनाच्या दबावामुळे शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला असला, तरी दुसरीकडे अभिनेत्री श्रीलेखा यांच्यावरील या वादाचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number