प्रसिद्ध गायक उदित नारायण एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान चाहतीला किस केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या घटनेनंतर त्यांच्या जुन्या व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.एका व्हायरल क्लिपमध्ये, उदित नारायण स्टेजवर “टिप टिप बरसा पानी” गात असताना एका महिला चाहतीसोबत फोटो घेताना दिसतात. मात्र, फोटोसाठी उभे असताना त्यांनी अचानक तिला किस केल्याने चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर लोकांनी त्यांच्या जुन्या व्हिडिओंना पुन्हा उघडकीस आणले आहे, ज्यामध्ये ते अलका याज्ञिक, श्रेया घोषाल आणि करिश्मा कपूर यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तींना किस करताना दिसतात.
जुने व्हिडिओ पुन्हा चर्चेत
इंडियन आयडॉलच्या एका जुन्या भागात उदित नारायण यांनी अलका याज्ञिक यांच्या गालावर किस केल्याचे दिसते, ज्यामुळे त्या अस्वस्थ होत लगेच निघून जातात. याशिवाय, श्रेया घोषालला पुरस्कार वितरण सोहळ्यात किस केल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
उदित नारायण यांचे स्पष्टीकरण
या वादावर स्पष्टीकरण देताना उदित नारायण म्हणाले, “चाहते खूप वेडे असतात. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत. गर्दीत असताना लोक प्रेमाने भेटतात, हात मिळवतात, काही वेळा भावना अनावर होतात. या गोष्टींना इतके मोठे रूप देण्याची गरज नाही.”
हेही वाचा: या व्हॅलेंटाईन आठवड्यात रेट्रो प्रेमींना खास भेट!
मात्र, सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून, काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे तर काहींनी त्यांचे समर्थन केले आहे.