मुंबई : सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण गुरूवारपासून चर्चेत आहे. बुधवारी रात्री सैफवर चाकूने हल्ला झाला. या प्रकरणी गुरूवारी आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने सैफवर चाकूने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात त्याच्यावर सहा जखमा झाल्या. त्यातील दोन जखमा या गंभीर स्वरूपाच्या आहेत. लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी पाठीतून काढलेला चाकूचा तुकडा समोर आला आहे. चाकूचा तुकडा पाठीत अडकल्यानं सैफच्या पाठीला गंभीर जखम झाली आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा नवा व्हिडिओ समोर येत आहे. इमारतीमध्ये प्रवेश करतानाचा सीसीटीव्ही समोर आला आहे.
सैफ अली खानवर गुरूवारी उपचार करण्यात आले आणि आज त्याला आयसीयूमधून स्पेशल रुममध्ये शिफ्ट केले आहे. सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा आहे. सैफ रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात आला असे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. आणखी खोलवर चाकूचा तुकडा घुसला असता तर जीवाला धोका होता.पाठीतील जखमेमुळे इन्फेक्शनची शक्यता म्हणून आरामाचा सल्ला दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. सैफ अली खानला आठवडाभर आरामाची गरज आहे. सैफ अली खान यांना चालण्यास काही समस्या नाही. 2 ते 3 दिवसांनंतर डिस्चार्जबाबत निर्णय घेऊ. सैफ अली खान यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
हेही वाचा : मुंबईतील सैफ अली खानवर हल्ला, मुंबई पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात
सैफबाबत काय सांगितलं डॉक्टरांनी?
रक्तबंबाळ अवस्थेत सैफ रुग्णालयात दाखल झाला
एखाद्या वाघाप्रमाणे सैफनं हिम्मत दाखवली
अवघ्या 2 मिमीनं थोडक्यात सैफचा मणका वाचला
चाकू आणखी खोल घुसला असता तर मणक्याला गंभीर दुखापत झाली असती
पॅरालिसिस होण्याचा कोणताही धोका नाही
मात्र इन्फेक्शनचा धोका असल्यानं सक्त विश्रांतीची गरज
सैफच्या तब्येतीत सुधारणा
सैफ आता पायावर चालण्यास सुरुवात
आयसीयूतून सैफला स्वतंत्र रुममध्ये शिफ्ट केलं
पाठीमध्ये पाणी झाल्यानं सैफवर शस्त्रक्रिया
गुरुवारी पहाटे सैफवर शस्त्रक्रिया