Friday, March 21, 2025 09:02:08 AM

Valentine Week : 15 व्या वर्षी अभिनेत्री रेखासोबत सेटवर घडला होता असा प्रकार, कधीच लाभलं नाही 'खरं प्रेम'

अभिनेत्री रेखा यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकात त्यांच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने लिहिले गेले आहे. त्यांची अफेअर्स असोत किंवा लग्नाविषयीच्या चर्चा असोत, या सर्व गोष्टींबद्दल यात लिहिले आहे.

valentine week  15 व्या वर्षी अभिनेत्री रेखासोबत सेटवर घडला होता असा प्रकार कधीच लाभलं नाही खरं प्रेम

Actress Rekha's Lovelife : हिंदी चित्रपटांतली सदाबहार अभिनेत्री रेखा यांचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिले आहे. दोन लग्नांविषयीची चर्चा आणि अनेक अफेअर्सनंतरही, रेखा आज वयाच्या 67 व्या वर्षी अविवाहित आहेत. लोकांनी याला अनेक तऱ्हेच्या दृष्टिकोनांमधून पाहिले. रेखाच्या पतीचे लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच निधन झाले. त्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी तिला दुर्दैवी म्हणून टाकून दिले. समाजातही त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले.

रेखाचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले होते. त्यापैकी अमिताभ बच्चन यांच्याशी असलेले त्यांचे नाते सर्वश्रुत आहे. याशिवाय जितेंद्र, विनोद मेहरा, किरण कुमार यांच्यासह अनेक लोकांशी त्यांचे नाव जोडले गेले. इतकेच नाही तर, रेखाबद्दल असे म्हटले जाते की, तिने विनोद मेहराशी गुपचूप लग्न केले होते. तर, दुसरीकडे अशीही चर्चा आहे की ती अविवाहित असूनही तिच्या भांगात अमिताभ बच्चन यांच्या नावाने कुंकू लावते. रेखा यांच्या 'रेखा: द अनटोल्ड स्टोरी' या चरित्रात त्यांच्या आयुष्याबद्दल बरेच काही लिहिले गेले आहे, हे पुस्तक यासर उस्मान यांनी लिहिले आहे.

किशोरवयीन रेखासोबत झालं होतं शोषण
रेखाच्या पुस्तकात असे नमूद आहे की, जेव्हा तिने तिच्या करिअरची सुरुवात केली, तेव्हा तिला 'अनजाना सफर' चित्रपटासाठी एक रोमँटिक सीन शूट करावा लागला. तेव्हा शुटींगदरम्यान सेटवर तिचा सह-अभिनेता, विश्वजित चॅटर्जीने किशोरवयीन रेखाच्या कंबरेभोवती हात टाकून तिला जवळ खेचले आणि तो तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला. रेखा काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच, क्रू मेंबर्स आणि तिथे उपस्थित असलेले सर्वजण शिट्ट्या वाजवू लागले आणि तिची चेष्टा करू लागले. दिग्दर्शकाने तब्बल 5 मिनिटे 'कट' सुद्धा म्हटले नाही. हा प्रकार रेखाला खूप लाजिरवाणा वाटला आणि तिच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले.

रेखा आणि अमिताभ यांच्याबद्दल चर्चा
रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या नात्याविषयी चर्चा तर सर्वांनीच ऐकली असेल. आजही रेखा तिच्या भांगामध्ये अमिताभ बच्चन यांच्या नावाने कुंकू लावते, असे म्हटले जाते. जरी हे दोघे वर्षांपूर्वी एकत्र दिसले असले तरी आता ते एकमेकांपासून अंतर राखणेच पसंत करतात. रेखाने अनेक वेळा अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेमाचे संकेत दिले आहेत, परंतु अमिताभ यांनी ते टाळले आहे.

हेही वाचा - Amitabh Bachchan Post Viral: 'जाण्याची वेळ झालीय...' चाहते पडले काळजीत!

जितेंद्रने विश्वासघात केला होता
रेखा आणि जितेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि या काळात त्यांच्यातील जवळीक वाढली. रेखाला जितेंद्र आवडू लागला होता. पण जितेंद्र त्यावेळी विवाहित होता. एकदा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, रेखाने जितेंद्रला असे म्हणताना ऐकले की, रेखा त्याच्यासाठी टाईमपास आहे. यानंतर रेखाने त्याच्यापासून स्वतःला दूर केले. परंतु यासाठी तिला घर तोडणारीचा टॅग मिळाला. रेखाचे नाव किरण कुमारसोबतही जोडले गेले होते. परंतु हे नाते फार काळ टिकले नाही आणि लवकरच ते दोघे वेगळे झाले.

विनोद मेहरा सोबत गुप्तपणे लग्न केले होते
असे म्हटले जाते की, विनोद मेहरा आणि रेखा यांनी गुपचूप लग्न केले होते आणि जेव्हा ते रेखाला त्यांच्या आईला भेटायला घेऊन गेले तेव्हा त्यांची आई रागावली आणि त्यांनी रेखाला मागे ढकलले. तथापि, रेखाच्या मते, विनोद मेहरासोबतच्या तिच्या लग्नाच्या बातम्या खोट्या आहेत.

हेही वाचा - राहुल द्रविडची रिक्षाचालकाशी भररस्त्यात वादावादी; कारला रिक्षाची धडक लागल्याने नाराज, VIDEO व्हायरल


सम्बन्धित सामग्री