Usha Chavan: ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी परत केले शासकीय पुरस्कार; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

उषा चव्हाण यांची पुण्यातील धनकवडी भागात स्वतःची खाजगी जमीन आहे. या मालमत्तेवरून सध्या मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.

Usha Chavan: ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी परत केले शासकीय पुरस्कार; काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

Usha Chavan: मराठी सिनेसृष्टीतील ‘सोंगाड्या’ आणि ‘पांडू हवालदार’ फेम दिग्गज अभिनेत्री उषा चव्हाण यांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आपल्या हक्काच्या जमिनीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देऊनही न्याय मिळत नसल्याने, त्यांनी सरकारचा निषेध म्हणून त्यांना मिळालेला जीवनगौरव पुरस्कार आणि इतर मानचिन्हे ठाण्यातील दिवंगत आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर अर्पण केली आहेत.

नेमकं प्रकरण काय?  
उषा चव्हाण यांची पुण्यातील धनकवडी भागात स्वतःची खाजगी जमीन आहे. या मालमत्तेवरून सध्या मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. उच्च न्यायालयाने ही मालमत्ता अद्याप ‘अविभाजित’ असल्याचे स्पष्ट करत, उषा चव्हाण यांचा मुलगा हृदयनाथ कडू-देशमुख यांचा कायदेशीर हिस्सा मान्य केला आहे. न्यायालयाचे आदेश असतानाही पुणे महानगरपालिकेने Ganga Goel India Pvt. Ltd. या बिल्डर कंपनीच्या हितासाठी TDR मंजूर केल्याचा खळबळजनक आरोप उषा चव्हाण यांनी केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालय, नगरविकास विभाग आणि थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नाही.

हेही वाचा – Jailer 2 Set Accident: तमिळ सिनेसृष्टी हादरली; रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ च्या सेटवर 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, कारण समोर
 
‘यंत्रणाच अशी वागली तर दाद कोणाकडे मागायची?’
उषा चव्हाण यांनी आपली व्यथा मांडताना सोशल मीडियावर एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘मी माझे संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आणि कलेसाठी वेचले. तरीही आज मला माझ्या हक्कासाठी इतका मोठा लढा द्यावा लागत आहे. जर माझ्यासारख्या कलाकाराची ही अवस्था असेल, तर सामान्य मराठी कुटुंबांचे हाल काय होत असतील, याचा विचारही करवत नाही.’

आनंद दिघे यांच्या आश्रमात ठेवले पुरस्कार 
न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या उषा चव्हाण यांनी अखेर सरकारकडून मिळालेले पुरस्कार स्वतःकडे न ठेवण्याचा निर्णय घेतला. ठाण्यातील आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळी जाऊन त्यांनी हे सर्व सन्मान सुपूर्द केले. “न्यायालयाचा निकाल बाजूने असतानाही जर शासन तो राबवू शकत नसेल, तर या शासकीय पुरस्कारांचे माझ्यासाठी काहीही मोल नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील TDR घोटाळा आणि महसूल विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सिनेसृष्टीतूनही यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number