मुंबई : बॉलिवूडची हॉट अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा सध्या चर्चेत आली आहे. मलायका अरोरा हिच्या विरोधात एक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या वॉरंटमध्ये एका मारहाणी संदर्भातील आहे. सैफ अली खान मारहाण प्रकरणात तिला वॉरंट बजावण्यात आली आहे. हे प्रकरण 2012 साली घडलेलं आहे.
2012 मध्ये अभिनेता सैफ अली खान याने एका व्यावयासिकाला मारहाण केली होती. या मारहाणीनंतर त्या व्यावसायिकाने तक्रार दाखल केली होती. याच संदर्भात साक्षीदार म्हणून मलायका अरोर हिला वॉरंट पाठवण्यात आलं आहे.
हेही वाचा : 'तो व्हिडिओ जुना'; घोटीतील शाळा प्रशासनाचं स्पष्टीकरण
नेमकं प्रकरण काय?
2012 साली मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका एनआरआय व्यावसायिकाला मारहाण केल्याचा आरोप अभिनेता सैफ अली खान याच्यावर आहे. त्यावेळी सैफसोबत त्याची पत्नी करीना कपूर, तिची बहीण करिश्मा कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि इतर काही मित्र होते. मारहाणीच्या घटनेनंतर व्यावसायिक इक्बाल मीर शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. सैफने नाकावर मारले. त्यामुळे नाक फ्रॅक्चर झाले. इतकंच नाही तर सैफ आणि त्याच्या मित्रांनी त्यांच्या सासऱ्यालाही मारहाण केल्याचा आरोप इक्बाल शर्मा यांनी केला. या प्रकरणात मलायका अरोराला साक्षीदार म्हणून बोलवण्यात आलेलं होतं. मात्र ती वेळोवेळी कोर्टात हजर झाली नाही. त्यामुळे फेब्रुवारी 15 रोजी तिच्यावर जामीनपात्र वॉरंट निघालं होतं. तरीही ती कोर्टात हजर झाली नाही, म्हणून एप्रिल 8 रोजी पुन्हा तिच्यावर वॉरंट जारी करण्यात आलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी एप्रिल 29 रोजी होणार आहे. तोपर्यंत मलायकाला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमृता अरोराने काय सांगितलं?
सैफच्या मैत्रिणींपैकी एक असलेल्या अमृता अरोरा हिने ते सर्वजण मजा करत होते. काही वेळानंतर इक्बाल शर्मा नावाचा व्यावसायिक तिथे येऊन रागाने बोलू लागला. नंतर सैफने त्याची माफी मागितली. काही वेळाने वॉशरूममध्ये काहीतरी घडलं आणि भांडण सुरू झालं असे कोर्टात सांगितले.