Sunday, April 20, 2025 05:30:01 AM

Friday OTT Releases: 'या' आठवड्यात होणार मनोरंजनाचा धमाका! ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहा नवनवीन चित्रपट

वीकेंड जवळ येत असताना,घर बसल्या ओटीटी कंटेट पाहून जर तुम्ही आराम करण्याच्या मूडमध्ये असाल ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

friday ott releases या आठवड्यात होणार मनोरंजनाचा धमाका ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहा नवनवीन चित्रपट

वीकेंड जवळ येत असताना,घर बसल्या ओटीटी कंटेट पाहून जर तुम्ही आराम करण्याच्या मूडमध्ये असाल ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. शुक्रवारी, ओटीटी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर (OTT Streaming Platform) नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज यांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. क्राइम थ्रिलर्स आणि के-ड्रामा यासारखे वेब सीरीज आणि चित्रपट या आठवड्यात रिलीज होणार आहेत. तर नवीन चित्रपटदेखील थिएटरमध्ये दाखल होतील. चला तर जाणून घेऊया. 


रेव्हलेशन्स - नेटफ्लिक्स:

नेटफ्लिक्स 'रेव्हलेशन्स' (Revelation) हा एक आकर्षक आणि नवीन कोरियन ड्रामा प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. ही वेब सिरीज एका पाद्रीची कथा सांगते जो एका गुप्तहेरासोबत काम करतो आणि बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणाची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करतो. त्यांच्या तपासात एक गडद वळण (dark turn) येते. ज्यामुळे, त्यांना त्यांच्या आतील राक्षसांचा सामना करण्यास प्रवृत्त करते.

 

कन्नेडा - जिओहॉटस्टार:

हा चित्रपट, एक संघर्षमय क्राईम थ्रिलर आहे. हा चित्रपट, 1990 च्या दशकातील एका पंजाबी स्थलांतरिताभोवती फिरतो, जो कॅनडामध्ये वंशवादाशी लढण्यासाठी संगीताचा वापर करतो. न्यायासाठीचा त्याचा संघर्ष त्याला धोकादायक व्यक्तींसोबत संघर्षात टाकतो.  ज्यामुळे तो तणावपूर्ण आणि भावनिक होतो. या चित्रपटात परमिश वर्मा (Parmish Verma), क्रिस्टोफर कुरोस (Christopher Kouros), सॅम्युअल डब्ल्यू हॉजसन (Samuel W Hodgson) मुख्य भूमिकेत आहेत. 


ड्रॅगन – नेटफ्लिक्स:


हा एक विनोदी चित्रपट आहे. हा चित्रपट मूळ तमिळ भाषेत आहे. अश्वथ मारिमुथु (Ashwath Marimuthu) यांनी ड्रॅगन (Dragon) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ड्रॅगन (Dragon) एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची कथा सांगतो, जो त्याच्या क्रशने (Crush) नाकारल्यानंतर उच्च पगाराची नोकरी मिळविण्यासाठी बनावट पदवी मिळवतो. पण, काळजीपूर्वक रचलेले खोटे हळूहळू उलगडू लागते. त्यामुळे, चित्रपटात अनपेक्षित ट्विस्ट येतात.


स्काय फोर्स – प्राइम व्हिडिओ:

हा चित्रपट 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील एका विशिष्ट घटनेवर आधारित आहे, जिथे भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सरोद हवाई तळावर हल्ला केले होते. हा चित्रपट अॅक्शन ड्रामा, आकर्षक हवाई लढाई आणि देशभक्तीने परिपूर्ण आहे. या चित्रपटात, अक्षय कुमार, सारा अली खान, वीर पहारिया, आणि निम्रत कौर मुख्य भूमिकेत आहेत.


सम्बन्धित सामग्री