Kangana Ranaut: ‘माझा भूतकाळ काहीही असो, मला विचारसरणी बदलण्याचा अधिकार…’; इंस्टाग्राम व्हिडीओद्वारे टीकाकारांना उत्तर

सोशल मीडियावर स्वतःचे जुने व्हिडिओ आणि फोटो शेअर करून थट्टा करणाऱ्यांना कंगनाने एका नव्या व्हिडिओद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे.

Kangana Ranaut: ‘माझा भूतकाळ काहीही असो, मला विचारसरणी बदलण्याचा अधिकार…’; इंस्टाग्राम व्हिडीओद्वारे टीकाकारांना उत्तर

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. सोशल मीडियावर स्वतःचे जुने व्हिडिओ आणि फोटो शेअर करून थट्टा करणाऱ्यांना कंगनाने एका नव्या व्हिडिओद्वारे सडेतोड उत्तर दिले आहे. “मी पूर्वी स्वतःला एक मध्यममार्गी हिंदू मानत असे, पण आता मला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) विचारधारा स्वीकारून ‘संघी’ बनायचे आहे,” असे स्पष्ट वक्तव्य करत कंगनाने नवीन राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे.

हेही वाचा – Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकर ‘या’ दिग्दर्शकासोबत अडकली होती विवाहबंधनात? या व्यक्तीच्या दाव्याने उडाली खळबळ

‘काळाप्रमाणे मानसिकता बदलते; मलाही मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य’
कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत टीकाकारांवर जोरदार हल्लाबोल केला. काळाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची मानसिकता आणि जीवनशैली बदलू शकते, असा युक्तिवाद करत कंगनाने म्हटले की, स्वतःच्या धारणा बदलण्याचा अधिकार संविधानाने तिलाही दिला आहे. भूतकाळात आपण ‘आयटम नंबर्स’ला केलेला विरोध, समान वेतनासाठी दिलेला लढा किंवा घराणेशाहीविरोधात उठवलेला आवाज या गोष्टींचा दाखला देऊन स्वतःचे समर्थन करण्याची आता गरज उरलेली नाही, असेही तिने स्पष्ट केले. स्वतःचे वर्णन एक ‘जागरूक’ आणि ‘शिस्तप्रिय’ हिंदू असे करत, आपण भाजप-आरएसएसची विचारधारा स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिने ठामपणे सांगितले.

‘समाजाची दुटप्पी भूमिका; हिंदू मुलींवरच प्रश्नचिन्ह का?’
आपल्या व्हिडिओच्या शेवटी कंगनाने समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवले. “लोक आजही माझे दहा वर्षांपूर्वीचे व्हिडिओ शोधून काढून माझ्या भूतकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जर समाज इतरांना त्यांच्या पसंतीनुसार धर्म किंवा विचारसरणी बदलण्याचे स्वातंत्र्य देतो, तर हिंदू मुलींना तो अधिकार का नाकारला जातो?” असा सवाल तिने उपस्थित केला. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय किंवा टीकेचा सामना न करता प्रत्येक महिलेला स्वतःची श्रद्धा आणि जीवनमार्ग निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, असंही कंगनाने म्हटलं आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number