Tuesday, November 18, 2025 03:44:45 AM

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी काम केलेला मराठी चित्रपट कोणता?, जाणून घ्या बिग बींचा मराठी चित्रपटसृष्टीशी संबंध

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज 11 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करुन प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

amitabh bachchan अमिताभ बच्चन यांनी काम केलेला मराठी चित्रपट कोणता जाणून घ्या बिग बींचा मराठी चित्रपटसृष्टीशी संबंध

मुंबई: बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा आज 11 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करुन प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. बिग बी यांचे भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांनी काम केलं आहे. वयाची 82 वर्ष उलटून गेली तरीही बिग बी आज नेहमीच्याच उत्साहाने काम करत असतात. बिग बी यांनी एका मराठी चित्रटातही काम केलं होत, हे फार कमी लोकांना माहित नसेल. तुम्हाला त्या चित्रपटाचं नाव माहीत आहे का? अमिताभ बच्चनचा मराठीशी संबंध आल्याच्या या काही आठवणी चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल्या आहेत.  

अमिताभ यांचा मराठी चित्रपट कोणता?
अमिताभ बच्चन यांनी मराठी चित्रपटात भूमिका साकारण्याचाही योग आला आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या चित्रपटाची निर्मिती त्यांचे मेकअप मन दीपक सावंत यांनी केली आहे. या चित्रपटाचे नाव 'आक्का' ( 1994 ) आणि श्रीधर जोशी यांनी चित्रपटाचे  दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्यावर तू जगती अधिपती नमन तुला पहिले श्री गणपती असे श्री गणपतीचे आरती‌ गीत होते. याचे चित्रीकरण मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील देवळात करण्यात आले.

हेही वाचा: Amitabh Bachchan 83rd Birthday : मध्यरात्रीपासूनच जल्लोष! अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा'समोर चाहत्यांची गर्दी; कन्या आणि नातही पोहोचली

काय म्हणाले दिलीप ठाकूर?
अमिताभ बच्चन यांचा मराठी चित्रपटसृष्टीशी सर्वप्रथम संबंध 'एकापेक्षा एक' 'च्या ज्युबिली हिट सोहळ्याला आला. मराठी चित्रपट निर्माते सतिश कुलकर्णी यांनी आपल्या तुलसी प्रॉडक्शन्सच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'एकापेक्षा एक'च्या ज्युबिली हिट सोहळ्यास खास अमिताभ बच्चनलाच आमंत्रित करण्यात यश मिळवलं. खुद्द सतिश कुलकर्णी यांनी अमिताभचे तेव्हाचे सेक्रेटरी शीतल जैन यांच्याशी संपर्क साधून अमिताभ यांचा होकार मिळवला असे दिलीप ठाकूर यांनी सांगितले. अमिताभ यांची ही मराठीतील पहिली उपस्थिती होती. आदबशीर अशी शाल लपेटून अमिताभ आले होते. मला आठवतंय त्याच दिवशी त्याची भूमिका असलेला मुकुल आनंद दिग्दर्शित 'हम' प्रदर्शित झाला. अमिताभ यांच्या येण्याने 'एकापेक्षा एक'च्या यशाची उंची आणखीन वाढली. जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा शानदार सोहळा पार पडला होता. व्यासपीठावरील सचिन पिळगावकर यांचा उत्साह अतिशय बोलका होता.


सम्बन्धित सामग्री