Yogita Chavan and Saurabh Choughule: मराठी सिनेसृष्टीतील 'जीव माझा गुंतला' या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले कलाकार योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले हे वेगळे होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या समाज माध्यमावर सुरू आहे. या दोघांनी 2024 मध्ये लग्न केले होते.
गेल्या काही महिन्यांपासून योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल समाज माध्यमावर अनेक गोष्टी समोर येत आहेत, ज्यामुळे त्यांच्यात काहीतरी बिघडले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांनी एकत्र असलेले कोणतेही फोटो किंवा पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलेले नाही.
हेही वाचा: Rajanikanth : सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ? पोलिसांनी घेतला शोध पण...
दिवाळीतही दोघे एकत्र नव्हते
यंदा दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणावेळीही त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले नाहीत. दोघांनी त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडिया अकाउंट्सवरून डिलीट केले आहेत. याव्यतिरिक्त दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ते दोघेही गेल्या काही महिन्यांपासून एकत्र राहत नसल्याचे बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे योगिता आणि सौरभ विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीत सुरू आहे. परंतु या जोडप्याने अद्याप या चर्चांवर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.
कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेमुळे योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची जोडी लोकप्रिय झाली. ऑनस्क्रीन प्रेक्षकांची लाडकी ठरलेल्या या जोडीने 2024 मध्ये लग्नगाठ बांधली. पण आता ही जोडी वेगळी झाल्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय.