Friday, December 05, 2025 01:04:43 AM

India's Got Latent Season 2 : मोठ्या वादानंतर समय रैना पुन्हा चर्चेत, ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ बद्दल दिली अपडेट

दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या त्याच्या लाईव्ह शोदरम्यान समयने केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

indias got latent season 2  मोठ्या वादानंतर समय रैना पुन्हा चर्चेत ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’ बद्दल दिली अपडेट

India's Got Latent Season 2: लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन समय रैन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या “इंडियाज गॉट लेटेंट” या शोच्या दुसऱ्या सीझनबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या त्याच्या लाईव्ह शोदरम्यान समयने केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. शनिवार, 8 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या “स्टिल अलाइव्ह अँड अनफिल्टर्ड” या कार्यक्रमात समयने परफॉर्मन्स दरम्यान सांगितले की, तो हा शो परत आणणार आहे. त्याच्या या वक्तव्यावर प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर सोशल मीडियावर #IndiasGotLatent2 हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.

हेही वाचा - Rakhi Sawant On Urvashi Rautela : नैसर्गिक सौंदर्याच्या विधानावरून राखी सावंतचा उर्वशी रौतेलावर निशाणा, म्हणाली, 'सत्य लपवण्यापेक्षा ते...'

“इंडियाज गॉट लेटेंट” चा पहिला सीझन मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. त्यानंतर दुसऱ्या सीझनसाठी चाहते सातत्याने मागणी करत होते. आता समय रैनाच्या संकेतामुळे चाहते म्हणत आहेत की “सीझन 2 लवकरच येणार हे नक्की!”

हेही वाचा - Love U Muddu Movie: लव्हस्टोरी असावी तर अशी! सोलापूरच्या जोडप्याची प्रेमकथा मोठ्या पडद्यावर

यापूर्वी समय रैन वादात अडकला होता. त्याच्या शोदरम्यान केलेल्या टिप्पण्यांवरून वाद निर्माण झाला होता. यानंतर क्युअर एसएमए फाउंडेशन ऑफ इंडियाने समय आणि इतर कॉमेडियन्सविरोधात याचिका दाखल केली होती. समयने 26 ऑक्टोबर रोजी त्याचा 28 वा वाढदिवस साजरा करताना एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्याने लिहिले होते, “आज माझा वाढदिवस आहे, पण तो साजरा करण्याऐवजी मी माझ्या भूतकाळातील चुकीबद्दल अपंग लोकांची मनापासून माफी मागू इच्छितो.” या प्रामाणिक माफीनंतर आणि नव्या घोषणेनंतर समय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवत आहे. आता सर्वांचे लक्ष “इंडियाज गॉट लेटेंट 2” च्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.


सम्बन्धित सामग्री