Dhurandhar 2: सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘धुरंधर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून कमाईचे नवे विक्रम करत आहे. रणवीर सिंग आणि संजय दत्त यांच्या दमदार अभिनयासोबतच या चित्रपटातील इतर कलाकारांचीही जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, या सर्वांमध्ये अभिनेत्री यामी गौतम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.चित्रपटात यामी गौतमची भूमिका खूप मोठी नसली तरी तिची उपस्थिती लक्षवेधी ठरते. ती एका नर्सच्या छोट्या भूमिकेत दिसते आणि तिचा स्क्रीन टाइमही फार कमी आहे. तरीसुद्धा तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. मात्र, यापेक्षा जास्त चर्चा तिच्या मानधनावरून सुरू झाली आहे.
माहितीनुसार, या छोट्याशा भूमिकेसाठी यामी गौतमने तब्बल 8 कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे. एवढ्या कमी वेळासाठी इतकं मोठं मानधन मिळाल्यामुळे सोशल मीडियावर याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहीजण तिच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत, तर काहीजण एवढ्या मोठ्या फीवर प्रश्न उपस्थित करत आहेत.विशेष म्हणजे ‘धुरंधर 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलं आहे, जे यामी गौतमचे पती आहेत. त्यामुळे या मानधनाबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, चित्रपटातील तिच्या भूमिकेला मिळालेल्या प्रतिसादामुळे ही फी योग्य असल्याचंही काहींचं मत आहे.
हेही वाचा:OTT Webseries: प्रेक्षकांना अस्वस्थ करणारा पत्नीवरील अत्याचाराचा 'तो' प्रसंग; ढसाढसा रडला अभिनेता, सांगितला अनुभव
‘धुरंधर 2’ची कमाईही जबरदस्त सुरू आहे. सुमारे 400 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात मोठा गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट 1500 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.रणवीर सिंगच्या करिअरमधील हा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरत असल्याचं बोललं जात आहे. त्याच्या अभिनयाचंही सर्वत्र कौतुक होत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटातील अॅक्शन, कथा आणि सादरीकरणाला चांगली दाद दिली आहे.
‘धुरंधर 2’ हा चित्रपट केवळ त्याच्या कथानकामुळेच नव्हे, तर कलाकारांच्या मानधनामुळेही चर्चेत आहे. यामी गौतमच्या छोट्या पण प्रभावी भूमिकेने आणि तिच्या फीने इंडस्ट्रीत वेगळीच चर्चा रंगवली आहे. आता पुढील काही दिवसांत हा चित्रपट आणखी कोणते विक्रम प्रस्थापित करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.