Best Mileage Bikes: पेट्रोलच्या वाढत्या दराची चिंता सोडा! ‘या’ स्वस्त बाइक्स देतात 70 किलोमीटरपर्यंत मायलेज; पाहा नावे आणि किमती

वाढत्या पेट्रोल दरांमुळे कमी खर्चात जास्त मायलेज देणाऱ्या बाइक्सना मोठी मागणी आहे.

Best Mileage Bikes: पेट्रोलच्या वाढत्या दराची चिंता सोडा! ‘या’ स्वस्त बाइक्स देतात 70 किलोमीटरपर्यंत मायलेज; पाहा नावे आणि किमती

दररोजच्या वापरासाठी कमी खर्चात जास्त मायलेज देणाऱ्या बाइक्सना भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. वाढत्या पेट्रोल दरांमुळे ग्राहक आता अशा बाइक्सकडे वळत आहेत ज्या खरेदीला स्वस्त, देखभालीला कमी खर्चिक आणि मायलेजमध्ये दमदार आहेत. 

या यादीत सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे Hero Splendor Plus. ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाइक्सपैकी एक आहे. तिची किंमत साधारण 75,000 ते 77,000 रुपयांपासून सुरू होते आणि प्रत्यक्ष वापरात 60 ते 65 किलोमीटर प्रती लिटरपर्यंत मायलेज देते. कमी देखभाल खर्च आणि विश्वासार्ह इंजिन ही तिची मोठी ताकद आहे.

Hero HF Deluxe ही कमी बजेटमधील उत्तम बाइक मानली जाते. तिची किंमत साधारण 60,000 ते 67,000 रुपयांदरम्यान आहे आणि ती 65 ते 70 किलोमीटर प्रती लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते. विद्यार्थ्यांपासून ग्रामीण भागातील वापरकर्त्यांपर्यंत अनेकांसाठी हा स्वस्त आणि टिकाऊ पर्याय आहे.

जास्त मायलेज हवे असल्यास Bajaj Platina 100 हा चांगला पर्याय आहे. ही बाइक साधारण 70 किलोमीटर प्रती लिटरपर्यंत पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते. हलके वजन आणि साधे डिझाइन असल्याने शहरातील वाहतुकीत ती चालवणे सोपे जाते. 

हेही वाचा: Nanded Heatstroke Death: नांदेडमध्ये उन्हाचा कहर! पारा 41 अंशांच्या पार, उष्माघाताने एकाचा दुर्दैवी मृत्यू

थोडी जास्त पॉवर आणि फीचर्स हवे असतील तर Honda SP 125 आणि TVS Raider 125 या बाइक्स चांगले पर्याय ठरू शकतात. Honda SP 125 ची किंमत सुमारे 88,000 रुपयांपासून सुरू होते आणि ती सुमारे 63 किलोमीटर प्रती लिटरपर्यंत मायलेज देते. TVS Raider 125 ची किंमत 82,000 रुपयांपासून सुरू होते आणि ती स्टायलिश डिझाइनसोबत 55 ते 56 किलोमीटर प्रती लिटरपर्यंत मायलेज देते.

एकूणच पाहता, कमी खर्चात जास्त मायलेज देणारी बाइक घ्यायची असल्यास हे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. तर थोडी अधिक पॉवर, फीचर्स आणि स्टायलिश लूक हवा असल्यास Honda SP 125 आणि TVS Raider 125 कडेही ग्राहकांचा कल वाढत आहे. तुमच्या बजेट, वापर आणि मायलेजच्या गरजेनुसार योग्य बाइक निवडल्यास दररोजचा प्रवास अधिक किफायतशीर आणि सोयीस्कर होऊ शकतो.

हेही वाचा: Most Expensive Toll: महाराष्ट्रात देशातील सर्वात महागडा टोलनाका; टोलचे दर ऐकून तुम्हालाही फुटेल घाम

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number