मुंबई: 1 जानेवारी 2025 रोजी बीएसएनएलने नवीन प्लॅन्स सादर केले होते. त्याचसोबत, कंपनीने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनची नवीन सूची त्यांच्या X अकाऊंटवर प्रसिद्ध केली. या सूचीमधील अनेक बीएसएनएल रिचार्ज प्लॅन हे देशातील सर्व सर्कलमध्ये उपलब्ध आहेत आणि भविष्यातही राहतील. म्हणजेच, तुम्ही देशभरातील कोणत्याही सर्कलमध्ये या प्लॅनचा लाभ घेऊ शकता. आता आपण बीएसएनएलच्या 90 दिवस वैधतेच्या परवडणाऱ्या प्लॅनचे फायदे जाणून घेऊया.
यात ग्राहकांना चांगला 'यूजर' अनुभव मिळण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी BSNL ने एक खास प्लॅन आणला आहे. विशेष म्हणजे हा प्लॅन मात्र 2 रुपयांचा असेल. हा बीएसएनएलचा 90 दिवस वैधतेचा एक अत्यंत परवडणारा प्लॅन आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिवसाला फक्त 2 रुपये खर्च येतो. या प्लॅनची किंमत फक्त सुमारे 201 रुपये आहे. या प्लॅनसोबत तुम्हाला 90 दिवसांची वैधता सोबत आणखी अनेक फायदे मिळतात.
बीएसएनएलच्या या प्लॅननुसार, तुम्हाला भारतातील कोणत्याही नंबरवर 300 मिनिटांची कॉलिंग सुविधा मिळते. याशिवाय, या प्लॅनमध्ये 6 जीबी डेटा देखील दिला जातो. सोबतच, कंपनीकडून 99 एसएमएसचा लाभही प्रदान केला जातो.या कमी किमतीच्या प्लॅनमुळे BSNLला फायदा होऊ शकतो. Jio ने देखील नवीन 49 रुपयांचा प्लॅन सादर केला आहे ज्यामध्ये ग्राहकांना 49 रुपयात 25 जीबी हाय 'स्पीड डेटा' मिळेल. या प्लॅनची वैधता 1 दिवस असेल. गेल्या जुलै महिन्यात रिचार्जच्या किमती वाढल्याने ग्राहक टेलिकॉम कंपन्यांवर नाराज होते. याचं मूळ नुकसान Jio आणि Airtel ला झालेलं. या नवीन प्लॅन्स मार्फत ग्राहकांना चांगला 'यूजर' अनुभव' देण्याचा प्रयत्न टेलिकॉम कंपन्या करत आहेत.