मुंबई: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या नियमांमध्ये मोठे बदल केले असून हे बदल 13 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाले आहे. या सुधारणांमुळे आता देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, आता पीएफ (Prominent Fund) आणि ईपीएस (Pension Fund) मधून आता पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे.
ईपीएफओने सदस्यांसाठी आंशिक निधी काढण्याचा मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा केली असून, आता कर्मचारी त्यांचे खाते ऑनलाईन सहजपणे उपलब्ध करू शकतात. या नव्या सुधारणा केवाळ तांत्रिक नव्हे, तर कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानल्या जात आहेत.
ईपीएसशी संबंधित महत्त्वाचे बदल खालीलप्रमाणे आहेत
1 - ईपीएस काढण्यासाठी 36 महिन्यांचा कालावधी: जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली किंवा बेरोजगार झाला, तर तो आपल्या पेन्शन निधीचा (EPS) हिस्सा केवळ 36 महिने उलटल्यानंतरच काढू शकतात. पूर्वी का कालावधी फक्त 2 महिने होता. या बदलामुळे कर्मचारी दीर्घकालीन बचतीकडे अधिक प्रवृत्त होतील.
2 - पेन्शन पेमेंट व्यवस्था पूर्णपणे डिजिटल: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) केंद्रीकृत पेन्शन पेमेंट व्यवस्था (Centralized Pension Payment System) सुरू केली आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना आता कोणतयाही बॅंकेच्या शाखेतून त्यांचे पेन्शन मिळवणे शक्य होईल. पूर्वी पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) ज्या शाखेतून जारी केला गेला, तिथेच पेन्शन घेणे बंधनकारक होते.
हेही वाचा: Post Office Scheme : एकदा गुंतवणूक करा आणि दरमहा मिळवा 5,500 रुपये! योजना या लोकांसाठी ठरतेय वरदान
3 - किमान पेन्शन रक्कम वाढणार: सध्या पेन्शन ईपीएस-95 अंतर्गत किमान पेन्शन दरमहा एक हजार रुपये आहे. ही रक्कम सुमारे 11 वर्षांपूर्वी निश्चित झाली होती. कामगार विषयक संसदीय स्थायी समितीने या रकमेचा आढावा घेत वाढ करण्याची शिफारस केली आहे. लवकरच या बाबतीत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.
4 - ईपीएस-95 योजनेचा आढावा सुरू: ईपीएफओ आणि कामगार मंत्रायलयाने ईपीएस-95 योजनेचा सखोल आढावा सुरू केला आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती, महागाई आणि जीवनमान लक्षात घेऊन ही योजना सुधारित केली जाणार आहे.
5 - जास्त पगारावर पेन्शनचा अधिकार: न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानंतर ईपीएफओने स्पष्ट केले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जास्त पगाराच्या आधारे योगदान दिले आहे, त्यांना आता उच्च पेन्शन मिळेल.