मुंबई: रेल्वे प्रशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वर तब्बल 80 दिवसांसाठी पुनर्विकास करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा पॉवर ब्लॉक 1 ऑक्टोबर ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत असेल. या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वर पॉवर ब्लॉक करण्यात येणार आहे.
यादरम्यान, प्लॅफार्म क्रमांक 18 वर पायाभूत कामे आणि सुरक्षा बॅरिगेट्स उभारण्याची कामे केली जातील. या काळात, काम पूर्ण होईपर्यंत आणि प्लॅटफॉर्म पुन्हा वाहतुकीसाठी वापरला जाईपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वरून सर्व रेल्वे सेवा बंद राहतील.
परिणामी, 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्या, ट्रेन क्रमांक 12112 अमरावती-सीएसएमटी एक्सप्रेस आणि ट्रेन क्रमांक 11002 बल्लारशाह-सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस, पुढील सूचना मिळेपर्यंत दादर येथे थांबविण्यात येतील. तसेच, मध्य रेल्वे प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कारण हे ब्लॉक दीर्घकालीन पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी अत्यंत गरजेचे आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे, मध्य रेल्वे लाईन आणि ट्रान्स-हार्बर रेल्वे लाईनवरील रेल्वे सेवांवर परिणाम होईल. विद्याविहार आणि ठाणे दरम्यान, ठाणे आणि वाशी/नेरुळ दरम्यान, अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवर महत्त्वाच्या अभियांत्रिकी आणि देखभालींच्या कामांना चालना देण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार आणि ठाणे दरम्यान मेन लाईनच्या 5 व्या आणि 6 व्या लाईनवर सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत रविवारी ब्लॉक घेण्यात येईल.
खालील दिलेल्या माहितीप्रमाणे डाऊन रेल्वे विद्याविहार येथे डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. यानंतर, ठाणे येथे पुन्हा वळवल्या जातील. त्यामुळे, 10-15 मिनिटे विलंब होईल:
11055: एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस
11061: एलटीटी-जयनगर पवन एक्सप्रेस
16345: एलटीटी-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
17222: एलटीटी-काकीनाडा एक्सप्रेस
हेही वाचा: PM Modi Mumbai Visit Postponed: पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा पुढे ढकलला; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत मोदींशी चर्चा
अप मेल/एक्सप्रेस रेल्वे गाड्यांवर परिणाम (सीएसएमटीकडे जाणारा):
खालील रेल्वे ठाणे येथील अप फास्ट लाईनवर वळवल्या जातील आणि त्या 10-15 मिनिटाने उशिराने पोहोचतील अशी अपेक्षा आहे:
11010: पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
12124: पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन
12126: पुणे-सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस
12140: नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्सप्रेस
22226: सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस
12321: हावडा-सीएसएमटी मेल
11012: धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस
मुंबई एलटीटीकडे जाणाऱ्या अप रेल्वे गाड्यांवर परिणाम:
रेल्वे गाड्या ठाणे येथे अप फास्ट लाईनने वळवल्या जातील, नंतर विद्याविहार येथे सहाव्या लाईनवर वळवल्या जातील:
13201: राजगीर-एलटीटी एक्सप्रेस
17221: काकीनाडा-एलटीटी एक्सप्रेस
12168: बनारस-एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस
12812: हटिया-एलटीटी एक्सप्रेस
ट्रान्स-हार्बर रेल्वे लाईन ब्लॉक:
ब्लॉक वेळ: सकाळी 11:10 ते दुपारी 4:10
बाधित विभाग: ठाणे - वाशी / नेरुळ (अप आणि डाऊन लाईन)
या कालावधीत ठाणे आणि वाशी / नेरुळ दरम्यानच्या सर्व अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा बंद राहतील.
रद्द केलेल्या लोकल रेल्वे सेवा:
ठाणे ते वाशी / नेरुळ / पनवेल पर्यंतच्या डाऊन सेवा: सकाळी 10:35 ते सायंकाळी 4:07
पनवेल/नेरुळ/वाशी ते ठाणे पर्यंतच्या सेवा: सकाळी 10:25 ते सायंकाळी 5:09