Monday, February 10, 2025 01:05:48 PM

Mahakumbh 2025
शाही स्नानाने महाकुंभाचा महाआरंभ

प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 चा प्रारंभ झालेला आहे

शाही स्नानाने  महाकुंभाचा महाआरंभ

 
प्रयागराज: प्रयागराजमध्ये महाकुंभ 2025 चा प्रारंभ झालेला आहे. महाकुंभ 2025 हा 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. शाही स्नानाने महाकुंभची सुरवात झाली.  
या कुंभमेळ्यात शाही स्नानासाठी देशभरातील भाविक तसेच परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. पौष पौर्णिमेनिमित्त शाही स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पंचांगानुसार पौर्णिमा पहाटे 5:03 वाजता सुरू झाली असून 14 जानेवारी रोजी पहाटे 3:56 वाजता समाप्त होईल.

शाही स्नानंचं महत्त्व:
शाही स्नान म्हणजे साधू-संत आणि आखाड्यांच्या प्रमुख पुजाऱ्यांसह संपूर्ण संत समुदायाचा धार्मिक विधी. या स्नानामुळे व्यक्ती पापमुक्त होते, मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. शाही स्नान धर्म, संस्कृती व अध्यात्माचा उत्सव असून संतांच्या आशीर्वादाचा भाग होण्यासाठी भाविक येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

यंदा प्रयागराज महाकुंभात 144 वर्षांनंतर एक दुर्मिळ योगायोग घडला आहे. सूर्य, चंद्र व गुरु शुभ स्थितीत असून सकाळी 7:15 ते 10:38 दरम्यान रवियोग निर्माण होणार. उत्तर प्रदेश सरकारला आशा आहे की यावेळी महाकुंभात देशी-विदेशी मिळून सुमारे 40 कोटी पर्यटक येतील. सरकारच्या मते, प्रत्येक पर्यटक सरासरी 5,000 रुपये खर्च करेल, ज्यामुळे सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होईल. मात्र, उद्योग विश्लेषकांच्या मते, प्रतिव्यक्ती खर्च 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, ज्यामुळे या महोत्सवातून 4 लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय होण्याची शक्यता आहे.

महाकुंभासाठी अनेक भारतीय व परदेशी कंपन्याही आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी इच्छुक आहेत. फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (FMCG), फार्मा, मोबिलिटी प्रोव्हायडर व डिजिटल पेमेंट कंपन्या या कालावधीत ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी 3,000 कोटी रुपयांहून अधिक खर्च करतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. याशिवाय, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) ने महाकुंभाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 45,000 टन स्टील पुरवले आहे. 


सम्बन्धित सामग्री