Tuesday, February 17, 2026 05:03:50 PM

PM Modi Wish on Republic Day: पंतप्रधान मोदींनी संस्कृत श्लोकातून सांगितले स्वातंत्र्याचे महत्व; देशवासियांना दिल्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

ऐक्य, राष्ट्रनिर्माण आणि विकसित भारताच्या संकल्पासाठी एकत्र पुढे जाण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

pm modi wish on republic day पंतप्रधान मोदींनी संस्कृत श्लोकातून सांगितले स्वातंत्र्याचे महत्व देशवासियांना दिल्या 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली: देशभरात आज उत्साहाचे वातावरण आहे. भारताचा प्रजासत्ताक दिन आज मोठ्या अभिमान आणि जल्लोषात साजरा केला जात असून, स्वातंत्र्यानंतर स्वीकारलेल्या संविधानाच्या मूल्यांची आठवण करून देणारा हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी विशेष महत्त्वाचा आहे. तिरंगा फडकावत, राष्ट्रगीताच्या साक्षीने आणि एकतेच्या संकल्पासह भारत देश आज लोकशाही, स्वातंत्र्य आणि संविधानाच्या गौरवाचा उत्सव साजरा करत आहे.

77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या असून, या राष्ट्रीय पर्वाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. “प्रजासत्ताक दिन हा आपल्या स्वातंत्र्य, संविधान आणि लोकशाही मूल्यांचे सशक्त प्रतीक आहे. हा दिवस आपल्याला एकजुटीने राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पासह पुढे जाण्यास नवी ऊर्जा आणि प्रेरणा देतो,” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी आपल्या शुभेच्छा संदेशात एका संस्कृत श्लोकाचा उल्लेख करत स्वातंत्र्याचे मोल अधोरेखित केले.
“पारतन्त्र्याभिभूतस्य देशस्याभ्युदयः कुतः।
अतः स्वातन्त्र्यमाप्तव्यमैक्यं स्वातन्त्र्यसाधनम्॥”
या श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केले की, स्वातंत्र्याशिवाय राष्ट्राचा उत्कर्ष शक्य नाही आणि ऐक्य हेच स्वातंत्र्याचे खरे साधन आहे.

हेही वाचा: IPS Abhijit Patil Success Story : लहान मुलासारखा दिसणारा IPS अधिकारी आहे तरी कोण? लहान वयात UPSC पास करणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल सविस्तरपणे जाणून घ्या

“विकसित भारत” या संकल्पनेवर भर देत पंतप्रधानांनी म्हटले की, हा प्रजासत्ताक दिना देशाच्या सामूहिक निर्धाराला नवे बळ देणारा ठरो. “ही संधी विकसित भारत उभारण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पात नवचैतन्य आणि उत्साह निर्माण करो,” अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली.

देशवासियांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले, “भारताची आन, बान आणि शान जपणारे हे राष्ट्रीय महापर्व प्रत्येकाच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि नवा उत्साह घेऊन येवो. विकसित भारताचा संकल्प अधिकाधिक दृढ व्हावा,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या संदेशामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रनिर्माण, ऐक्य आणि आत्मनिर्भरतेचा ठळक संदेश मिळाला असून, देशभरात हा उत्सव अभिमान आणि उत्साहात साजरा केला जात आहे. 

हेही वाचा: Ind Vs Nz T20: वनडे पराभवाचा हिशोब चुकता; सूर्याच्या नेतृत्वात भारताचा न्यूझीलंडवर 'सर्जिकल स्ट्राईक'; 3-0 ने मालिका जिंकली


सम्बन्धित सामग्री